*ज्ञानदेवराव बापु दांडगे विद्यालय धाड*
*मनोज भाऊ दांडगे यांच्या मातोश्री वत्सलाबाई दांडगे,पत्नी निता ताई मनोजराव दांडगे,सचिव उमेश भाऊ दांडगे,सदस्या सोनालीताई संतोषराव दांडगे,चि.प्रफुल मनोज राव दांडगे,भारतीय सैनिक सतीश गुळवे,तुषार कोथळकर,यांच्या वतीने झेंडावंदन करून प्रजासत्ताक दिन संपन्न*
धाड:- काल दिनांक 26/01/2025 रोजी ज्ञानदेवराव बापू दांडगे प्राथमिक,उच्च प्राथमिक,माध्यमिक,ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स,क्रॉप सायन्स,नर्सिंग (जी एन एम) कॉलेज व वरिष्ठ महाविद्यालय धाड येथे 76 वा प्रजासत्ताक दिवस झेंडावंदन करून अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात झेंडावंदन व दिपप्रज्वलन करून करण्यात आली.या प्रजासत्ताक दिवसानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेच्या आधारवड मा.श्रीमती वत्सलाबाई दांडगे तर प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थापक अध्यक्ष मनोजभाऊ दांडगे यांचे बंधू उमेश भाऊ दांडगे,निता ताई दांडगे,सोनाली ताई दांडगे,प्रफुल दांडगे,प्रा डवले सर तर विशेष आमंत्रित म्हणून मासरूळ येथील सतीश गुळवे (भारतीय सैनिक),तुषार कोथळकर (भारतीय सैनिक) झेंडावंदना साठी आमंत्रित होते कारण ज्या व्यक्ती देशाची सेवा करत आहे अशा व्यक्तीच्या हातून झेंडावंदन करून घेणे याचा वेगळा उत्साह शाळेला वाटला तसेच *आजचा हा प्रजासत्ताक दिवस आमच्या शाळेसाठी विशेष होता कारण गेल्या 7 महिन्यात शाळेच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी क्रीडा स्पर्धा,जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा,बुद्धिबळ स्पर्धा,तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा, मागील वर्षी झालेली स्कॉलरशिप स्पर्धा, सायन्स ऑलम्पियाड स्पर्धा,भाषण स्पर्धा, एलिमेंट्री परीक्षा इंटरमिजिएट परीक्षा तसेच दिनांक 1 जून 2024 ते 20 जानेवारी 2025 विविध जयंती,पुण्यतिथी,राष्ट्रीय सण,सा सांस्कृतिक कार्यक्रम निम्मित घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा,वादविवाद व इतर सर्वच स्पर्धा मध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळे नंबर मिळवून शाळेचे नाव संपूर्ण जिल्ह्यात नावारूपाला आणले हे विषेश.या सर्व स्पर्धामध्ये विजयी विद्यार्थ्यांना या आधी प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता व त्यांचे सर्वांनी अभिनंदन केले* आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी डान्स व ड्रामा सादर केले.
आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे उप प्राचार्य जाधव सर तसेच इयत्ता 9 वी च्या विद्यार्थिनी वैष्णवी पिंपळे व गौरी पोतदार यांनी केले तर प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य डवले सर यांनी केले तर आभार इयत्ता 9 वी ची विद्यार्थीनी धनश्री पिंपळे हिने केले व शाळेचे प्राचार्य डवले सर यांनी आपल्या मनोगतामध्ये शाळेच्या गेल्या सात महिन्यातील गुणवत्ता संदर्भात 26 जानेवारी च्या कार्यक्रमासंदर्भात व भविष्यात तीन महिन्यांमध्ये शाळेच्या विविध उपक्रमांविषयी गुणवत्ते संदर्भात कशा पद्धतीने नियोजन राहणार आहे या सर्व गोष्टींची चर्चा या निमित्ताने केली. *वत्सलाबाई आई दांडगे यांच्या वतीने अध्यक्षीय भाषणात मा.उमेश भाऊ दांडगे म्हणाले की शाळेच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर चमकून देशहिताची कामगिरी करताना पाहायला आवडेल व आकाशाला गवसणी घालणारे विद्यार्थी घडवायचे आहे असे म्हणाले* अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.या यशस्वी कार्यक्रमासाठी शाळेचे उपप्राचार्य शिक्षक जाधव सर,उप प्राचार्य चव्हाण सर, एच ओ डी राजपूत मॅडम,एच ओ डी बोर्डे मॅडम,एच ओ डी शिंदे मॅडम,कोथळकर सर,हिवाळे सर,गायकी सर,वसीम सर,योगेश हिवाळे सर,भारत भाऊ तायडे,तायडे मॅडम,पान पाटील मॅडम,बाजे मॅडम,उबाळे मॅडम,दांडगे मॅडम,लांडे मॅडम,देशमुख मॅडम,अपार मॅडम,बुधवत मॅडम,इंगळे मॅडम,सपकाळ मॅडम,डुकरे मॅडम,ठाकरे मॅडम,तायडे सर,ठाकूर सर,डोंगरे सर,कुन्नर सर,नरोटे सर,पांडव सर,त्याचप्रमाणे शाळेचे लिपिक तायडे सर,शिवणकर सर,संस्था लिपिक निखिल गरुड सर, निलेश हिवाळे सर,वाहन चालक भोजराज सोनुने,अरुण जाधव,राहुल इंगळे,संभाजी सोनुने,नितीन ठेंग,अनंता देवकर, कमलाकर उबाळे,विशाल बाजी,खान भाऊ 1, साबीर काका,सचिन नेवरे,किशोर तायडे,अक्षय ठेंग,दीपक पूरभे,विशाल बाजे,भुसारी भाऊ,धनरज धंदर, पवण खरात,रमेश रावळकर भाऊ,अनिल सुरडकर त्याचप्रमाणे मदतनीस छाया जाधव,वंदना ताई पंडित,देवकर ताई,काळे ताई,जयस्वाल ताई 1,जैस्वाल ताई 2,दुतोंडे ताई यांनी परिश्रम घेतले.
*प्रजासत्ताक दिनाचे व विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे काही क्षण*
Tags
प्रजासत्ताक दिन....