सोनेवाडी येथील बस स्थानकाची काँग्रेस कार्यकर्त्याकडून नासधुस


चिखली
"सबका साथ सबका विकास" हे ध्येय उराशी बाळगून चिखली मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या विकास कन्या आमदार सौ श्वेताताई महाले यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या बस स्थानकाची काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नासधूस केली.

विकास कन्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये शहर व ग्रामीण भागामध्ये विकासाची गंगा घरोघरी पोहोचवली. ग्रामीण भागात अद्यापही दळणवळणाच्या साधनांसाठी लाल परी अर्थात एसटीचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्या जातो. मात्र स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही ग्रामीण भागातील जनतेला बस स्थानकाची सुविधा अनेक ठिकाणी पुरवण्यात आली नव्हती त्यामुळे रणरणत्या उन्हात किंवा मुसळधार पावसात देखील नागरिकांना उभे राहावे लागत होते.क्वचित ठिकाणी बस स्थानका जवळ असलेल्या झाडाचा आडोसा घेत नागरिक ऊन व पावसापासून आपले रक्षण करत होते. यामध्ये माता भगिनींची मोठ्या प्रमाणावर कुचंबना होत होती. आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी आपल्या विकास निधीतून चिखली शहर व ग्रामीण भागामध्ये ठिकठिकाणी बस स्थानक उभे केले. अतिशय देखणी व दर्जेदार भव्य दिव्य असे हे स्थानक नागरिकांना ऊन वाऱ्यापासून बचाव करत आहे. मात्र विकासाचा पोटशूळ उठलेल्या विरोधकांना आमदार सौ श्वेता महाले यांचे हे कार्य न रुचल्यामुळे चिखली तालुक्यातील सोनेवाडी येथील बसस्थानकाची विलास राखुंडे नामक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांने नासधुस केली या बस स्थानकावर लावण्यात आलेल्या बॅरिगेट्स वर मोठमोठ्या दगडांचा व लोखंडी रोडचा मारा करून त्यांनी हे बस स्थानक विद्रुप करून टाकले तर बस स्थानकावर प्रवाशांना बसण्यासाठी ठेवण्यात आलेल्या खुर्च्यांची देखील मोठ्या प्रमाणावर नासधूस केली विशेष म्हणजे राखुंडे याचे हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून या व्हिडिओच्या आधारे शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकतो.
विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या नेत्याच्या झालेल्या पराभवामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या राखुंडे यांनी हे कृत्य केले असल्याची चर्चा सध्या सोनेवाडी परिसरात सुरू असून आमदार सौ  श्वेताताई महाले पाटील यांचा विकासरथ रोखण्यासाठी विरोधकांनी अत्यंत हीन दर्जाचा मार्ग अवलंबला असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये दिसत आहे.

Previous Post Next Post