चिखली : आ. श्वेताताई महाले यांच्या कार्यकुशल नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नीरज चौधरी व अडत व्यापारी संजय ढोले यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून भाजपात जाहीर प्रवेश केला. दि. २६ जानेवारी रोजी चौधरी व ढोले यांनी आ. महाले यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. याप्रसंगी आ. श्वेताताई महाले यांनी दोघांचे भाजपामध्ये स्वागत केले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुहास शेटे, जिल्हा सचिव सुरेंद्र पांडे, चिखली अर्बन बँकेचे संचालक सुशील शेटे, प्रतिथयश व्यापारी दीपक वाधवाणी, आशिष धनलोभे, सुरेंद्र ठाकूर, दीपक श्रीवास्तव, रितेश सुराणा, शेख अनिस, शिवराज पाटील गोविंद कोठारी, सतीश काकडे, सुनील शर्मा, गजू तारू यांची उपस्थिती होती. नीरज चौधरी व संजय ढोले यांच्या माध्यमातून आडत व्यापारी व शेतकरी वर्गात भारतीय जनता पक्षाचे संघटन अधिक मजबूत होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करत आ. श्वेताताई महाले यांनी दोघांनाही पक्षात योग्य तो सन्मान मिळेल अशी ग्वाही यावेळी बोलताना दिली.
Tags
भाजपा प्रवेश..