भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ...


चिखली:- जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थांच्या वतीने भव्य रक्तदान महायज्ञाचे आयोजन दिनांक 4 जानेवारी रोजी ग्रामीण रुग्णालय चिखली येथे करण्यात आले आहे. "रक्तदान श्रेष्ठ दान" असल्याने दरवर्षी या महायज्ञाचे आयोजन करण्यात येते. पूर्ण महाराष्ट्रातून एक लाख बॉटल रक्त संकलन करण्याचा संकल्प असतो. त्याचाच एक भाग म्हणून चिखली येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
         तरी इच्छुक रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिराच्या महायज्ञात सहभागी होऊन राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन दिपक चिंचोले पीठ इंजिनिअर, सौ लताताई चिंचोले जिल्हा निरीक्षक, गणेश खडोळ जिल्हा अध्यक्ष, सौ.निंभोरे ताई महिला अध्यक्ष यांनी केले आहे.
Previous Post Next Post