किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य,वैयक्तिक स्वच्छता विषयक मार्गदर्शन
धाड येथील ज्ञानदेवराव बापू दांडगे विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत सौ.वैशाली दिलीप तायडे यांचा किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य,वैयक्तिक स्वच्छता,मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी,मोबाईलचा अतीवापर यांसह विविध विषयांवर व्याख्यान कार्यक्रम संपन्न झाला.
विद्यालयाचे प्राचार्य संतोष डवले यांच्या मार्गदशनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.प्रमुख दरम्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक विभागाच्या प्रमुख सौ. प्रणाली बोर्डे तर प्रमुख उपस्थिती म्हणून सौ.मनिषा उमेश दांडगे ह्या होत्या..
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.मनिषा दांडगे यांनी केले.
बोलतांना त्या म्हणाल्या की,मुलींचे आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे,यासाठी विशेषत: किशोरवयीन मुलींनी आपल्या वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच या विषयाबाबत मुलींनी आपली आई,बहिण किंवा आपल्या शिक्षिका यांच्याशी खुलेपणाने संवाद साधला पाहिजे.असे मत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्यात्या सौ.वैशाली दिलीप तायडे यांनी विद्यार्थिनीना मार्गदर्शन करताना मासिक पाळी ही मातृत्वाची पहिली व आवश्यक पायरी असून, तिची भीती बाळगण्याचे काहीही कारण नाही.उलट स्त्रीला मिळालेले ते एक वरदान आहे. त्यामुळे कोणत्याही संकोचाविना ते स्त्रीने आनंदाने स्विकारावे.
या काळात आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून स्वच्छतेची व पुरेशा विश्रांतीची गरज असते.तसेच किशोरींना वयानुसार होणारे शारीरिक बदल, तसेच आरोग्याची निगा राखण्याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.
अल्पवयीन मुली तसेच महिला यांच्यावर दिवसेंदिवस वाढत चाललेला अत्याचार,लैंगिक शोषण थांबवले गेले पाहिजे.
या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कशा कराव्या याबाबत आपल्या अध्यक्षीय भाषणात सौ.प्रणाली बोर्डे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उपप्राचार्य अमोल जाधव यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्रचार्य अमोल जाधव,प्रविण चव्हाण तसेच सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
दांडगे विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती निमित्त व्याख्यान...
bykhabarbat news
-
0