अकोला--महिलांनी सावित्रीबाईंच्या वाटेने पुढे जावे.हा मार्ग खडतर असला तरी आत्मसन्मानाचा असल्याचे प्रतिपादन डॉ. मीनाक्षी मोरे यांनी केले
आरोग्य ज्ञानवर्धीनी संस्था द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय गोकुळ कॉलनी, अकोला येथे सावित्री उत्सव प्रसंगी कर्तव्यदक्ष महिला सत्कार समारंभ व क्रीडा दिनाच्या कार्यक्रमात बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष महादेवराव भुईभार होते.सत्कारमूर्ती बबनराव कानकिरड , डॉ.सौ. मिनाक्षी मोरे ,संस्थेचे पदाधिकारी दिलीप गोहाड , वसंतराव गावंडे , विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. मंदाकिनी तळोकार, प्राथमिक मुख्याध्यापिका सौ.नंदा कुकडे,.माजी अध्यापिका सौ. शालिनी धडम , सौ. छाया बिजवाडे, यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूजनाने झाली. शाळेच्या संगीत चमुनी छान स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले . त्यानंतर सत्करमुरतींचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सोबतच कष्टकरी महिला-पालकांचा सत्कार करण्यात आला. सौ.ज्योती जगताप, सौ. वंदना भटकर,सौ. मनवर यांना पुष्गुच्छ देऊन गौरविण्यात आले. सत्कारमूर्ती बबनराव कानकिरड यांनी आपल्या सुंदर अशा ओघवत्या शैलीमध्ये हसत खेळत मुलांचे ज्ञानरंजन केले. इयत्ता 10 वी तील विद्यार्थिनीने 'मी सावित्री बोलतेय' यावर आपले स्वगत व्यक्त केले. त्यानंतर क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. सर्व वर्गांचे वेगवेगळे ड्रिल्स सादर करण्यात आल्या. 10 वी च्या विद्यार्थिनीनी लेझिम नृत्य सादर केले. इयता 9 वी तील विद्यार्थ्यानी डंबेल्स ड्रिल सादर केले.
महादेवराव भुईभार यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन सौ ज्योती इंगळे यांनी केले.आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका सौ. मंदाकिनी तळोकार यांनी केले. कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Tags
आपल अकोला....