बुलढाणा-
दिव्य सेवा प्रकल्प वरवंड येथे निवासी मनोयात्री माता बांधवांचा मोठया उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला दि 26 जाने 2025 म्हणजेच प्रजासत्ताक दिनी. रस्त्यावर बेवारस पणे आयुष्य जगणाऱ्या या जीवांना स्वतः चे नाव माहीत नसतं, तर जन्मदिन माहीत असण्याचा प्रश्नच नाही परंतू तरिही आपला जन्मदिन कुणी साजरा करावा, आपल्याला हि केक, पेढा भरवावा, आपले हि कुणी औक्षण करावे, असे त्यांना ही वाटतेच म्हणून भारताचा गणतंत्र दिन त्यांचा जन्मदिन म्हणून साजरा करण्यासाठी आम्हाला योग्य वाटले.आपल्या लेकरा प्रमाणेच या माता बांधवांना हि आपण नविन कपडे, गोड धोड जेवण सर्वांना कप केक, मोठा केक, स्टेज वरिल भरगच्च कार्यक्रम, फटाके, नाच गाणे असे दिवसभर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पाहुण्यांच्या उपस्थिती मध्ये
दिव्य सेवा प्रकल्पातील माऊली प्रभुजी नी आनंदाने केक कट केला नंतर पारंपरिक पद्धतीने आदीवासी नृत्य डान्स केले,अनेक पाहुण्यांच्या डोळ्यात आनंदअश्रू अनावर झाले.
या अनोख्या कार्यक्रमासाठी प्रभुजी माउलीच्या जन्मदिनाचे पालकत्व घेऊन त्यांचे हक्काचे नातेवाईक म्हणून त्यांचा जन्मदिन अविस्मरणीय केला . आपल्या सारखाच या बेवारस माता बांधवांचा ही जन्मदिन साजरा करण्यासाठी अनेक मान्यवरांनी उपस्थित लाभली..
मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जन्मतारखेचे दाखले ही वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी श्री गुलाबराव खरात, वस्तू व सेवा कर अधिकारी श्री निलेश जैन, बुलढाणा अर्बन चे संस्थापक श्री राधेश्यामजी चांडक भाईजी, तहसीलदार श्री विठ्ठल कुमरे बुलढाणा अर्बन चे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर, कार्यकारी अभियंता श्री मंगलसिंग चव्हाण, श्री अरुण जैन पत्रकार, ज्योती पाखरे, मानव सेवा संस्था, गजानन इंगळे, विजय वाकडे, व इतर मान्यवर उपस्थिती होते.
आपण आल्याने आम्हाला खूप आनंद झाला!
आपल्या पेक्षा इतरांची दुखः जास्त आहेत हे जेव्हा मान्य कराल, तेव्हाच तुमचे जीवन आनंद दायी होईल.
जरा माणुसकीचे जीवन जगूया..!!