बुलडाणा -
बुलडाणा अर्बन को. ऑप. क्रे. सो. निर्मित असलेला राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित चित्रपट "राष्ट्रमाता जिजाऊ" आज दिनांक 12 जानेवारी जिजाऊ जयंती निमित्त दुपारी 12 वाजता बी. सी सी. एन. व सिटी डिजिटल चॅनल वर प्रसारित केल्या जाणार आहे. यां माहितीपटा मध्ये लखूजीराव जाधव आणि राजमाता जिजाऊ यांची माहिती तसेच जिजाऊंनी कसे स्वराज्य स्थापने साठी त्यांचे पती शाहिजी राजे भोसले यांना प्रेरित केले व त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रेरित केले स्वराज्य उभे करायला हे सर्व दाखवले आहे. यां माहितीपटा मध्ये मराठी सिनेसृष्टी मधील मोठे अभिनेते श्री सुबोध भावे आहेत आणि राजमाता जिजाऊ यांची भूमिका प्राजक्ता गायकवाड यांनी केली आहे. हा "राष्ट्रमाता जिजाऊ" चित्रपट सर्वांनी पहावा असे आवाहन बुलडाणा अर्बन संस्थेचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक उपाख्य भाईजी, डॉ सुकेशजी झंवर, तसेच सौ कोमलताई झंवर यांनी केले.
Tags
बुलढाणा अर्बन.....