आमदार संजय गायकवाड यांच्याकडून पत्रकारांना मिळाले विम्याचे ‘कवच’ मराठी पत्रकार संघाच्या मेगा कॅम्पमध्ये असंख्य पत्रकारांनी घेतला लाभ


बुलढाणा : पत्रकारांच्या हितासाठी विमा कवचचे आयोजन 10 जानेवारी पत्रकार भवन येथे करण्यात आले होते. याकार्यासाठी 9 जानेवारी रोजी जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आवाहन  करण्यात आले होते. समाजाचे आरोग्य सांभाळणारा पत्रकार हा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो. समाज हिताची काळजी घेणाऱ्या पत्रकाराची काळजी घेतली जावी, त्याला जीवन सुरक्षा प्रदान व्हावी, या उदात्त हेतूने बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड गायकवाड यांनी पत्रकारांना विमा संरक्षण देण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला. 

 मराठी पत्रकार परिषद संलग्नित बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाकडून 6 जानेवारी मराठी पत्रकार दिनी पत्रकारांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 50 पेक्षा अधिक पत्रकारांनी सहकुटुंब आरोग्य तपासणी करीत शिबिराचा लाभ घेतला होता. त्याचवेळी पत्रकारांना विम्याची संरक्षण असावे, असा एक सूर पत्रकारांमधून उमटला होता.आ. गायकवाड यांनी भारतीय डाक विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 10 लाख रुपयांच्या अपघाती विम्याची पत्रकारांसाठी तरतूद केली. पत्रकारांच्या समस्या वेदना काय असते हे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले आहे. पत्रकार हा लढा देत असतो मात्र संकटाच्या काळी त्याच्यावर काही दुर्घटना घडल्यास त्याचा परिवार हा उघड्यावर पडतो त्यामुळे त्यांच्यावर अशी विपरीत वेळ येऊ नाही म्हणून यांनी विमा कवच आयोजित केला.
असे आहे विम्याचे स्वरूप

पत्रकारांसाठी 10 लाख रूपयांचा अपघाती विमा आ.गायकवाड यांच्या माध्यमातून उतरविण्यात आला आहे.  यामध्ये अपघाती मृत्यू झाल्यास, कायमचे अपंगत्व आल्यास 10 लाख रूपये, दवाखान्याचा खर्च 60 हजार रूपये, मुलाच्या शिक्षणाचा खर्च 1 लाखा रूपयापर्यंत, अ‍ॅडमिट असेपर्यंत 1 हजार रूपये, ओपीडी खर्च 30 हजार रूपये अशा प्रकारचे स्वरूप भारतीय डाक विभागाच्या अपघात विमा योजनेचे आहे.

0000000000000
Previous Post Next Post