चिखली : तोरणा गुरुकुल सीबीएससी शाळा उदयनगर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून विद्याधर महाले उपस्थित होते, त्याचबरोबर श्रीमती पुष्पलताताई महाले, श्रीधरजी महाले, श्रद्धाताई महाले, रवी पाटील कुळसुंदर, स्व. दयासागरजी महाले आयटीआय कॉलेज उदयनगरचे प्राचार्य ऋषिकेश गडम, तोरणा गुरुकुल सी बी एस सी शाळा उदयनगर, शाळेच्या प्राचार्या महेजबी पठाण या कार्यक्रमास उपस्थित होत्या.
ध्वजारोहणानंतर मशाल पेटवून विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास प्रारंभ केला, यावेळी विद्यार्थ्यांनी मार्च पास्ट केले व सर्व वर्गांचे ध्वज दाखवून ओथ करण्यात आले. प्रजासत्ताक दिनी क्रीडा महोत्सवामध्ये रनिंग रेस ,रिले रेस ,खो-खो, क्रिकेट ,या खेळांचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी आपले प्राविण्य पणाला लावून सर्व स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांबरोबरच पालक व माता-भगिनींसाठी सुद्धा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते पालकांनी व माता-भगिनींनी विविध स्पर्धेमध्ये उस्फूर्त सहभाग घेतला व आपली उपस्थिती नोंदवली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीतांवर ड्रिल सादर केले. व तसेच त्यांच्या ड्रिल मधून त्यांनी महत्त्वपूर्ण संदेश सर्वांपर्यंत पोहोचवले उदाहरणार्थ प्रदूषण टाळा प्लास्टिक वापरू नका जंक फूड खाऊ नका व व्यायाम करा.स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना आदरणीय विद्याधरजी महाले साहेब यांच्या हस्ते मेडल तसेच प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले व सोहळा संपन्न झाला.