वाहतूक नियमांचे पालन करा-आ.महाले
वाहन चालकांना माहिती पुस्तिकेचे वाटप...
नितीन फुलझाडे
चिखली:- सार्वजनिक बांधकाम मंडळ, अकोला अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग, बुलढाणा अंतर्गत सार्वजनिक बांधकाम उपविभाग, चिखली यांचे मार्फत 36 वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह 2025 चे चिखली येथे दिनांक 27/01/2025 रोजी रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मा.आ. सौ. श्वेताताई महाले, चिखली विधानसभा मतदारसंघ यांनी वाहन चालक यांना माहिती पुस्तिकेचे वाटप करून रस्ते नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमातंर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चिखली येथे रस्ता सुरक्षे विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या श्रीमती देशमुख मॅडम तसेच इतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तसेच विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. सा.बां. उपविभाग, चिखली कार्यालयाचे उपविभागीय अधिकारी डि.डि. चिंचोले यांनी रस्ता सुरक्षे विषयी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन, महामंडळ चिखली येथील कर्मचारी व प्रवाशांना रस्ता सुरक्षे बाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कर्मचारी व प्रवाशांना माहिती पुस्तिकेचे वितरण करण्यात आले.खामगांव चौफुली व मेहकर फाटा तसेच सा.बां. उपविभाग चिखली येथे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना रेडीयमच्या स्ट्रीप बसविण्यात आल्या. तसेच पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. नागरीकांनी या उपक्रमाची प्रशंसा केली व समाधान व्यक्त केले.
यावेळी सा.बां. उपविभाग, चिखली कार्यालयाचे एस.ई. मोरे सहा. अभियंता श्रेणी-2,एम.एल. केंधळे,एस.एस.वाघ, सहा.अ.श्रेणी-2 बी. एस. लबडे,आर.एस. कड, कनिष्ठ अभियंता, पी.बी.वायाळ,ए. एस. बेलोकर,जी.एस. जोशी, कु. पी. आर. काळे, स्था.अ.स. उपस्थित होते. तसेच कंत्राटदार सुधाकर इंगळे, विजय काकडे,राहुल सोळंकी, गोपाल जाधव,सागर इंगळे,निळकंठ महाले,पवन सुरूशे,रितेश पवार,चेतन पाटील,शंकर सोनोने,राजु सपकाळ उपस्थित होते.