सामाजिक कार्य करत असताना महिलांची आवड जोपसली : सौ. ॲड वृषालीताई बोंद्रे
चिखली: 27/01/2025
चिखली: 27/01/2025
कलागुण हे प्रत्येक महिलेमध्ये असतात फक्त ते त्यांना व्यक्त करण्याची संधी दिली पाहिजे. हिरकणी व अनुराधा परिवाराच्या माध्यमातून गत २३ वर्षांपासून सुरू असणारा हळदी कुंकवाचा कार्यक्रम महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला महिलांची मोठ्या संख्येने असणारी उपस्थिती ही सामाजिक कार्य करत असताना महिलांची आवड झोपली असल्याचे समाधान देऊन जाते, असे प्रतिपादन हिरकणी महिला अर्बनच्या अध्यक्षा सौ. ॲड वृषालीताई राहुल बोंद्रे यांनी केले.
जागर संस्कृतीचा सन्मान हिरकणीचा हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम रविवार २६ जानेवारी रोजी हिरकणी महिला अर्बनसमोर जयस्तंभ चौक चिखली येथे संपन्न झाला यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला माजी आमदार सौ. रेखाताई खेडेकर, सौ. मृणालीताई सपकाळ, अॅड. सौ. शर्वरी तुपकर, माजी जि.प.सदस्या सौ. ज्योतीताई खेडेकर, सौ. ज्योतीताई पडघान, अॅड. जयाताई राखोंडे, सौ. मिनलताई गावंडे, सौ. करूणाताई बोंद्रे, सौ. शोभाताई सवडतकर, सौ. प्रियाताई बोंद्रे, सौ. किरणाताई गाडेकर, सौ. सविताताई अंजनकर, यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना ॲड वृषालीताई बोंद्रे म्हणाल्या की, भारतीय संस्कृतीची परंपरा तसेच सौभाग्याचे देणं असणारा हळदी कुंकवाचा कार्यक्रम महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा ठरला आहे. विविध स्पर्धा , उखाण्याचा कार्यक्रम यातून महिलांनी आपल्या कलागुणाचे प्रदर्शन करून आकर्षक बक्षिसे जिंकली हे निश्चितच कौतुकास्पद आहे. यापुढेही महिलांसाठी आगळे - वेगळे उपक्रम राबवण्याची परंपरा चिखली शहरात निरंतर सुरू ठेवणार असल्याचे ॲड वृषालीताई बोंद्रे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे बहारदार संचलन किरणताई वाघमारे यांनी केले तर या कार्यक्रमाला चिखली शहर व परीसरातुन हजारो महिलांची प्रचंड गर्दी उसळली होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनुराधा अर्बन व हिरकणी महिला अर्बनच्या संचालक व संचालिका, पदाधिकारी, कर्मचारी, हिकरणी प्रतिष्ठाणच्या सर्व सदस्या यांनी परिश्रम घेतले.
महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हिरकणी पतसंस्थेचा पुढाकार : .ॲड वृषालीताई बोंद्रे
महिलांच्या लघु उद्योगासाठी हिरकणी महिला अर्बन सातत्याने पुढाकार घेत आहे. संस्थेने शंभर कोटीचा टप्पा पार केला असून महिला बचत गटांना जास्तीत जास्त कर्ज वाटप केले असल्याचे ॲड वृषालीताई बोंद्रे म्हणाल्या. तसेच महिला सक्षमीकरणासाठी हिरकणी महिला प्रतिष्ठान व अनुराधा परिवार कार्यरत असून आतापर्यंत विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम , गौरी सजावट स्पर्धा, चला खेळ खेळूया मंगळागौरीचा यासह विविध कार्यक्रमातून महिलांच्या कलागुणांना प्रतिष्ठानाच्या वतीने वाव देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
यांनी मिळवले बक्षिसे
उखाणे स्पर्धेत कोमलबाई परीहार, कांचनताई शिंदे, भारतीताई बावने, सुमित्राबाई ठोंबरे तर टिकली स्पर्धेत अश्विनी नागरे, शोभाताई सौंदरकर, विद्याबाई नाके तर फुगा फोडण्याच्या स्पर्धेत किर्तीताई ठेंगझोडे व किर्तीताई खत्री यांनी बक्षीसे मिळवली