*चोरटे मोटार सायकल वरून धूम स्टाईल पसार, चिखली शहरात खळखळ*
*चिखली – चिखली शहरातील पोहरकर हॉस्पिटलसमोर काल दि. 16 जानेवारी रोजी सायंकाळी अंदाजे 7:30 वाजता धक्कादायक सोनसाखळी चोरीची घटना घडली. त्रिवेणी अनंता शेळके (वय 42 वर्षे), या शिक्षिकेच्या गळ्यातील अंदाजे सव्वा तोळ्याची सोन्याची साखळी चोरीला गेली.*
*त्रिवेणी शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या त्यांच्या स्कुटी (MH 28 BD 5575) वरून जयस्तंभ चौकातील बोंद्रे पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून पुंडलीक नगर येथील घरी जात होत्या. पोहरकर हॉस्पिटलसमोर सिध्दसायन्स चौकाकडून येणाऱ्या एका मोटारसायकलवर दोन अनोळखी इसम आले आणि त्यांनी त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची सोन्याची चेन हिसकावली.*
*चोरीची घटना इतक्या झटक्यात घडली की त्रिवेणी यांना काही कळायच्या आत चोरटे मोटारसायकलने खामगाव चौफुलीच्या दिशेने पळून गेले. त्यांनी गाडी थांबवून मदतीसाठी आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत चोरटे फरार झाले होते. घटनास्थळी त्यांनी त्यांच्या गळ्यातील साखळीचा तुटलेला सव्वा तोळ्याचा एक भाग आढळून आला. उर्वरित साखळी, ज्याची अंदाजे किंमत ₹60,000 आहे, चोरट्यांनी लंपास केली.त्रिवेणी शेळके यांनी तत्काळ चिखली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. चिखली पोलीस ठाण्यात या घटनेत भारतीय न्याय संहितेच्या कलम 304(2) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे.*
Tags
आपली चिखली...