प्रजासत्ताक दिनी ठाणेदार संग्राम पाटील यांचा गौरव...
नितीन फुलझाडे
चिखली:- नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये 23-चिखली विधानसभा मतदार संघाचे पोलीस विभागाचे प्रमुख म्हणुन पोलीस निरीक्षक संग्राम पाटील, ठाणेदार पो. स्टे. चिखली यांचेकडे जबादारी सोपविण्यात आली होती.विधानसभा निवडणूक निःपक्ष व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ठाणेदार संग्राम पाटील यांनी आवश्यक त्या उपाययोजना करुन सदर उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी पो. स्टे. चे सहकारी अधिकारी अंमलदार यांचे वेगवेगळे पथक तयार केले. सदर पथकांनी आदर्श आचार संहीता कालावधीत विविध ठिकाणांवरुन मतदारांवर प्रभाव टाकण्याच्या उद्देशाने बाळगलेली एकुण 77,56,479/- (सत्त्यात्तर लक्ष छपन्न हजार चारशे एकोनऍशी) एवढी रक्कम जप्त केली. याशिवाय अवैध दारु विक्रीच्या 105 ठिकाणी छापे मारुन लाखो रुपयांचा गावठी, देशी - विदेशी दारुसाठा जप्त करण्यात आला तसेच आदर्श आचारसंहीता कालावधीत अवैध हत्यार बाळगणाऱ्या विरुध्द देखील कारवाई करण्यात आली.
एकंदरीत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये 23 चिखली विधानसभा मतदार संघात चिखली पोलीस स्टेशनने उल्लेखनिय कामगीरी करुन आदर्श आचार संहीतेची योग्य प्रकारे अंमलबजावणी केल्याबद्दल तसेच निवडणूका शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडल्याने जनमानसात पोलीस विभागाची प्रतिमा उंचावल्याबद्दल मा. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांचेकडुन प्रजासत्ताक दिनी ठाणेदार संग्राम पाटील यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
Tags
चिखली पोलीस...