‘देश का प्रकृती परीक्षण’ मोहिमेचा शुभारंभ

18 ते 70 वर्ष वयोगटातील नागरिकांचे होणार प्रकृती परीक्षण केंद्रीय आयुष मंत्रालयाचा अभिनव उपक्रम
बुलढाणा, दि. 6 (जिमाका) : भारत सरकारच्या केंद्रीय आयुष मंत्रालयच्यावतीने देशातील नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात ‘देश का प्रकृती परीक्षण’ एक नवीन अभिनव उपक्रम सूरु केला आहे. या उपक्रमांतर्गत आयुर्वेद शास्त्राच्या माध्यमातून आयुर्वेद चिकित्सकांकडून 18 ते 70 वर्ष वयोगटातील सर्व नागरिकांचे प्रकृती परीक्षण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी दि 5 डिसेंबर पासून करण्यात आला आहे. ही प्रकृती परिक्षण मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांचे प्रकृती परीक्षण ज्येष्ठ आयुर्वेद विशेषज्ञ्, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा ए. एस. पी. एम. आयुर्वेद मेडिकल कॉलेज, रुग्णालय व अनुसंधान संस्था, बुलढाणाचे प्राचार्य डॉ. राजेश्वर उबरहंडे यांनी करुन या मोहिमेचा शुभारंभ केला. प्रकृती परीक्षणासाठी ॲप केंद्रीय आयुष मंत्रालयाने सुरु केलेल्या देश का प्रकृती परीक्षण उपक्रमात नागरिकांना सहभागी होण्यासाठी ‘प्रकृती परीक्षण’हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपचा वापर करुन नागरीकांना आपल्या प्रकृती परीक्षणासाठी नोंदणी करता येणार आहे. जिल्ह्यातील नागरीकांनी या ॲपचाही वापर करुन मोहिमेत जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा, आसे आवाहन करण्यात आले आहे.
Previous Post Next Post