स्पर्धकांनी राष्ट्रीयस्तरावर बुलढाणा जिल्ह्याचे नावलौकीक करावे
- प्र.जिल्हाधिकारी सदाशीव शेलार
बुलढाणा, दि.5 (जिमाका) : जिल्हास्तरीय युवा महोत्सवातील गुणवंत स्पर्धकांनी विभागस्तर, राज्यस्तर आणि राष्ट्रीयस्तरावर बुलढाणा जिल्ह्याचे नावलौकीक करावे, असे प्रतिपादन प्र.जिल्हाधिकारी सदाशीव शेलार यांनी महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तथा राजर्षी शाहु कॉलेज ऑफ फॉर्मसीच्या एनएसएस विभागाच्या सहकार्याने जिल्हा क्रीडा संकुल, बुलढाणा येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून प्र जिल्हाधिकारी सदाशीव शेलार हे बोलत होते.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी राहुल पवार, प्रा.डॉ.गोविंद गायकी, नेहरु युवा केंद्राचे अजयसिंह राजपुत, मेहकरचे तालुका क्रीडा अधिकारी मिलींद काटोलकर आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक मनोगतात जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस.महानकर यांनी बुलढाणा येथील स्पर्धकांनी जिल्हास्तरावरुन विभागस्तर, राज्यस्तर व राष्ट्रीयस्तरावर नावलौकीक करावा अशा शुभेच्छा दिल्या. विभागीय युवा महोत्सव 6 डिसेंबर 2024 ला यवतमाळ येथे तर राज्यस्तर युवा महोत्सव 12 डिसेंबर 2024 रोजी नांदेड येथे आयोजित होणार असल्याची माहिती त्यांनी प्रास्ताविकात दिली.
प्रा.डॉ.गोविंद गायकी यांनी स्पर्धकांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी गतवर्षातील राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होऊन बुलढाणा जिल्ह्याचे नावलौकीक करणारी युवती तायडे हिचे सुध्दा अभिनंदन करण्यात आले.
या युवा महोत्सवात वक्तृत्व, लोकगित, लोकनृत्य, कथालेखन, चित्रकला, कविता, विज्ञानमेळा, मोबाईल फोटोग्राफी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये लोकनृत्य या प्रकारात श्री संत गजानन महाराज इंग्लिश स्कुल, शेगांव प्रथम, तर द्वितीय स्व.भास्करराव शिंगणे कला गावंडे वाणिज्य महाविद्यालय, साखरखेर्डा आणि तृतीय क्रमांक शासकीय अध्यापक महाविद्यालय, बुलढाणा यांनी मिळविला. मोबाईल फोटोग्राफी या स्पर्धेमध्ये प्रथम यशवंत विकास देशमुख, द्वितीय मयुर राम सोनुने, तृतीय दिपरत्न दिलीपराव जाधव, कथालेखन या स्पर्धेमध्ये प्रथम दिशा ललीत देवपुजारी, द्वितीय स्वाती वसंता चंद्रशेखर, तृतीय दिव्या संजय वानेरे, लोकगित स्पर्धेमध्ये प्रथम स्वराज ग्रुप, द्वितीय जिजामाता महाविद्यालय बुलढाणा आणि तृतीय शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाणा, कविता स्पर्धेमध्ये प्रथम धिरज जयराम जमधाडे, द्वितीय शुभम कडूबा गायकवाड, तृतीय अनुष्का कैलास रेहपांडे , चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम ओम रमेश शेळके, द्वितीय कु.सायली सचिन इंगळे, तृतीय दिपरत्न दिलीपराव जाधव, वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम श्रुती दिलीप तायडे, द्वितीय कृष्णाई संतोष नेमाडे, तृतीय मनस्वी मिलींद मधुपवार, विज्ञानमेळा (वैयक्तिक) प्रकारामध्ये प्रथम सोहील खान हमीद खान, द्वितीय दानिश मुश्ताक खाटीक, तृतीय विशाल पाथ्रीकर, विज्ञानमेळा (सांघिक) प्रकारामध्ये प्रथम सुप्रिया प्रल्हाद खारटूबे, द्वितीय भाग्यश्री केशव बोरक, तृतीय गोपाल शालीकराम इंगळे म्हणून विजयी झाले. या स्पर्धांमध्ये परिक्षक म्हणून प्रा.डॉ.गोविंद गायकी, धनंजय माहीतकर, टिळक क्षिरसागर, प्रा.गजानन लोहटे, छाया हरीश तायडे, अंजली परांजपे, मनोज नांद्रेकर, रंजना बोरीकर, प्रा.वैभव वाघमारे, प्रा.गजानन वानखेडे, विद्या देशमुख, अर्चना देव, वैशाली तायडे, अमर चिंतळे, पियुष टाकळकर, डॉ.पल्लवी जोशी, डॉ.विजय बोरकर प्राचार्य संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी, बुलढाणा, डॉ.अनंत तुकाराम मोरे, डॉ.आशीष गवई, डॉ.प्रकाश केंद्रे, संजय देवल, तुषार धारुरकर इत्यादींनी काम पाहिले.
या जिल्हास्तरीय महोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार व नियोजनबध्द रितीने करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी रविंद्र धारपवार यांनी तर आभार प्रदर्शन नेहरु युवा केंद्राचे अजयसिंग राजपूत यांनी केले.
यावेळी प्राविण्य प्राप्त प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे स्पर्धकांना रोख पारितोषीक, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या महोत्सवात जिल्ह्यातील बहुसंख्य स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.
Tags
युवा