अकोला-- आपले लग्न आपण लावा, सुलग्न वेळेवर लावा,लग्नावर होणारा अवास्तव खर्च टाळा आणि तो खर्च मुलांच्या शिक्षणावर, उद्योगधंद्यावर खर्च करा असे कळकळीचे आवाहन जेष्ठ सत्यशोधक महादेवराव भुईभार यांनी केले.
ते अकोला जिल्हा मराठा मंडळ कार्यालयात आयोजित पाटील बहुउद्देशीय सेवा समिती व अकोला जिल्हा मराठा मंडळाच्या 'ऋणानुबंध' परिचय पुस्तिकेच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते. महाबीजचे संचालक डॉ. रणजीत सपकाळ, पाटील बहुउद्देशीय सेवा समितीचे सचिव श्रीकृष्ण विखे, अकोला जिल्हा मराठा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, उपाध्यक्ष दिवाकर पाटील,कोषाध्यक्ष डाॅ.विनोद बोर्डे,सचिव प्रा. विवेक हिवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
10डिसेंबर 2024 रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय युवक युवती परिचय मेळाव्यातील संकलित परिचय पत्राची 'ऋणानुबंध' पुस्तिका काढण्यात आली.वाढती मागणी लक्षात घेता श्री गणेश झेरॉक्स सिव्हिल लाईन चौक अकोला येथे सकाळी10तेसायं 5वाजेपर्यंत उपलब्ध होईल.
वैराग्यमूर्ती संत वासुदेव महाराज कुठलाही मुहूर्त पाहून लग्नाची तिथी काढत नव्हते, वधूवरांची कर्तुत्व बघून सुघटिका चिंतन काढून देत होते. मुहूर्त काढूनही लोक वेळेवर लग्न लावत नाहीत. आता आपणच आपली लग्न लावायला शिकलं पाहिजे, लग्नामधील विडंबन बंद करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महादेवराव भुईभार यांनी याप्रसंगी केले.
पाटील बहुउद्देशीय सेवा समितीचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे.गेल्या पंचवीस वर्षात सातत्याने समाजामध्ये अनिष्ट चालीरीतींना पाय बंद घालून विधायक रचनात्मक कार्यासाठी समाजामध्ये फिरून परिचय पत्र गोळा करणे व त्यांची उत्कृष्ट आकृतीबद्ध ऋणानुबंध परिचय पुस्तिका प्रकाशित करणे हा अभिनव उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन डॉ. रणजीत सपकाळ यांनी केले.
याप्रसंगी ऋणानुबंध पुस्तिकेचे उत्कृष्ट संयोजन, अंक सजावट , मुद्रणाबद्दल व सूत्रसंचालनसाठी अथक परिश्रम घेतल्याबद्दल सर्वश्री सुभाष पाटील पुंडकर ,संजय पिसे, बबनराव कानकिरड व सौ.ज्योती इंगळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा.डॉ. विवेक हिवरे यांनी केले.
कार्यक्रमास अकोला जिल्हा मराठा मंडळाचे सहसचिव श्रीकांत प्रागृत, सदस्य डॉ. विनीत हिंगणकर, संजय सरप, पंकज देशमुख ,निलेश पाचडे, अनिल राऊत डॉ. निखिल बोर्डे ,पाटील बहुउद्देशीय सेवा समितीचे सुभाष पाटील पुंडकर, मनोहरराव महल्ले, बबनराव कानकिरड,सुरेश पागृत, महेंद्र पाटील,एड. रामेश्वर खोंड, प्रशांत काळे, गणेशराव काकड, शिवहरी टाले,अरुण देशमुख,अशोक बोंद्रे, बजरंग गावंडे, ऋतुराज अवताडे, सौ. सोनाली मोरे, प्रा. जयश्री बंड, सौ. ज्योती इंगळे, अजय निचळ, नंदकिशोर मिरगे, मंगेश थोरात, संदीप गावंडे, राजेश शित्रे,अजाबराव पारसकर, अरविंद निचळ,डॉ. निलेश पाटील, श्रीकृष्ण माळी,रविंद्र देशमुख यांचेसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
---------------------------------------------
Tags
आपले अकोला.....