आदिपिता प्रजापिता ब्रह्माबाबा जयंती साजरी


बुलडाणा 
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय एकता नगर सेवा केंद्रावर विद्यालयाचे बुलढाणा ब्रह्माकुमारी १५ डिसेंबर रोजी १४८ वी जयंती आध्यात्मिक सशक्तिकरण दिवस या रूपामध्ये सेवा केंद्रावर साजरी करण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ युवक विकास संस्था प्रा. मीनल आंबेकर उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाद्वारे प्रजापिता ब्रह्मा यांच्या जीवनातील प्रवासावर प्रकाश टाकण्यात आला. प्रजापिता ब्रह्मा यांचे नाव दादा लेखराज होते. दादा लेखराज हे प्रसिद्ध हिऱ्यांचे व्यापारी होते. दादा लेखराज ते प्रजापिता ब्रह्मापर्यंतचा प्रवास आणि त्यानंतर प्रजापिता ब्रह्मा यांनी कशाप्रकारे या संस्थेची स्थापना केली. यावर प्रकाश टाकण्यात आला.
प्रजापिता ब्रह्मा यांच्या जयंतीनिमित्त प्रा. मीनल आंबेकर, ब्रह्माकुमारी उर्मिलादीदी, ब्रह्माकुमारी पूनम दीदी, अनुराधा कुलकर्णी यांनी दीप प्रज्वलन केले. तसेच केक कटिंग करून प्रजापिता ब्रह्मा यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
Previous Post Next Post