आ.मनोज कायंदे यांच्या उपस्थितीत रामनगर येथे हरिनाम सप्ताहाची सांगता...


देऊळगाव घुबे (चिखली)  :-

प.पु.गुरुवर्य वै.देवपुरी बाबा यांच्या प्रेरणेने पावन झालेल्या रामनगर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे 51 वर्ष असून याहीवर्षी या ठिकाणी २७ डीसेंबर रोजी सपत्याची सांगता सींदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित तरुण आमदार मनोज कायंदे यांच्या उपस्थितीत  ह.भ.प.दिनकर महाराज थुट्टे भरोसा यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.
   सदर गावातील हरिनाम सप्ताहाचे आयोजन व नियोजन बघुन नेहमीच्या कार्यक्रमासी त्यांनी सदर गावामध्ये सभामंडप देण्याचे जाहीर करून पुढील कारवाई देखील लवकरच करण्यात येईल असे आश्वासन उपस्थितीतांना दिले.यावेळी उपस्थीतामध्ये,सुभाष देव्हडे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी ओबीसी,ह.भ.प.रामेश्वर महाराज,गणपत मोडेकर,आनंदराव होळकर, प्रमेश्वर भगत,अंकुशराव भगत,नंदकीशोर लेंडे, रामदास भगत पाटील,मोहन लेंडे, संजय भगत,रतीराम महाराज शितोळे, दत्तात्रय लेंडे,राजेंद्र भगत,विठ्ठल होळकर,सुखदेव जाधव, बाळकृष्ण भगत व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post