शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन...

चिखली:- शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 26 डिसेंबर रोजी शिव परिवाराच्या वतीने शहरात शोभा यात्रा काढण्यात आली होती.ही शोभायात्रा जयस्थंभ चौक येथे येताच फटाके फोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले व डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी राष्ट्वादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट माजी जिल्हा परिषद सदस्य  डॉ. सौ.ज्योतीताई खेडेकर, शहर अध्यक्ष रवींद्र तोडकर, उपाध्यक्ष सदाभाऊ मोरगंजे, ,प्रमोद चिंचोले, नितीन खुणारे ,प्राचार्य वायाळ सर, प्रा.राजेंद्र गवई, प्राचार्य चेके सर, व शिक्षकवृंद यांच्यासह अनेक मान्यवर उस्थितीत होते.
Previous Post Next Post