चिखली: विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करून त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणण्यात राष्ट्रीय सेवा योजनेचा महत्त्वाचा वाटा आहे. रा. से. यो. शिबिराच्या माध्यमातून स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा मुल्यांचे संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर रूजविल्या जातात, असे प्रतिपादन उपप्राचार्य श्री रामेश्वर कुटे सर यांनी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले.
शिबिराच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक बांधिलकी निर्माण होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कौशल्य विकासास चालना मिळते. असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष शिप्रम चे सहसचिव कैलास शेटे यांनी व्यक्त केले. शिक्षण प्रसारक मंडळ चिखली द्वारा संचालित, आदर्श कनिष्ठ महाविद्यालयचे राष्ट्रीय सेवा योजनेचे ग्राम जांभोरा येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन आज पार पडले. अध्यक्षस्थानी शिप्रम् चे सहसचिव कैलास शेटे ,तर
प्रमुख अतिथी उपप्राचार्य कुटे सर प्रा.तांबटकर सर प्रा.हिवाळे सर प्रा लोखंडे सर प्रा. देशमुख मॅडम प्रा.निमावत मॅडम इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा काकडे सर यांनी तर प्रास्ताविक प्रा हिवाळे सर यांनी केले. आभार प्रदर्शन विद्यार्थिनी प्रतिनिधी कु गायत्री इंगळे हिने केले.
Tags
आदर्श महाविद्यालय...