दांडगे विद्यालयात बालसभा संपन्न..

बालसभेतून जपला सामाजिक एकोपा.. धाड येथील ज्ञानदेवराव बापू दांडगे विद्यालयातंर्गत इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची 'बालसभा घेण्यात आली. यावेळी गुरु - शिष्याला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. बाल सभेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संतोष डवले हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप-प्राचार्य प्रवीण चव्हाण यांनी केले. बालसभेमध्ये विद्यार्थ्यांनी महापुरुषांबद्दल माहिती सांगितली तर कुणी देशभक्तीपर गीतांचे गायन केले.यासोबत विविध नाटिका व नृत्य यामधून सामाजिक संदेश दिला. समाजामध्ये सामाजिक बांधिलकी कायम राहावी या हेतूने अश्या निरनिराळ्या नाटिका विद्यार्थ्यांनी साजरा केल्या.सोबतच शाळेतील विद्यार्थ्यांनी पाण्याचा वापर, स्वच्छता तसेच दिनचर्या याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उषा शिंदे व सारिका देशमुख यांनी केले. तर आभार किरण डुकरे यांनी मानले. बालसभेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.रांगोळी, पुष्पगुच्छ, पुष्पहार, बसण्याची व्यवस्था, ध्वनीक्षेपण अशा विविध प्रकारची जबाबदारी सांभाळून कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले
Previous Post Next Post