50 प्रवाशी किरकोळ जखमी.
. वाघाळा गावागत घडली घटना .
.. मेहकर आगार विभागाचा निष्काळजीपणा.
चिखली : - बीबी वरून चिखली कडे परत येणाऱ्या एसटी प्रवाशी बसचा स्टेरिंग रोड तुटल्याने चालकाकडून अचानक बस रोड खाली जावून अपघात झाला . झालेल्या अपघातात 50 प्रवाशी किरकोळ जखमी झाल्याची घटना 9 डिसेंबर रोजी 4 वाजता वाघाळा गावालगत घडली . मात्र घटना होऊनही मेहकर आगार विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहचले नसल्याने वाहक चालकाला त्रास सहन करावा लागला.
चिखली आगार विभागाची चिखली - बीबी प्रवाशी एसटी बस ही बीबी वरून चिखली कडे परत येत असताना वाघाळा गावालगत येताच बसचा स्टेरिंग रोड तुटला असता चालकाने बस थाबविण्याचा मोठा प्रयत्न केला परंतु बस रोडच्या साईडला खाली जावून आदळली त्यामध्ये बसचे अतोनात नुकसान झाले. झालेल्या अपघातात वाहक चालकासह 50 ते 60 जण किरकोळ जखमी झाले. हा अपघात पाहताच शिवनी ते वाघाळा येथील नागरिक धावत येवून प्रवाशाना बस मधून बाहेर काढले. आणि जखमीना तात्काळ मलकापूर येथील रुग्णालयात हलविले मात्र घटनेला बराच वेळ होऊनही मेहकर आगार विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी उपस्थित झाला नव्हते त्यामुळे वाहक चासलकाला फार त्रास सहन करावा लागला.
Tags
बस अपघात...