बुलढाणा
बेघर बेवारस अनाथ मनोरुग्णाचे हक्काचे घर असलेले दिव्य सेव प्रकल्पाच्या वतीने बुलढाणा येथील वरवंड गोधनखेड येथे २६ ते ३० डिसेंबर दरम्यान ग्रामीण अध्ययन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ग्राम शहरी अध्ययन शिबिरात 'ग्रामीण वास्तव्य' हा मुख्य विषय अधोरेखित होणार आहे,त्याचबरोबर ५ दिवसीय हे निवासी शिबिर असून सर्व वयोगटासाठी खुले आहे हे ग्रामीण शहरी अध्ययन सामाजिक शिबिर आहे.
आपण समाजाचे काही देणे लागतो ही जाण ठेवून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी याकरिता ह्या शिबिराचे आयोजन केले जाते, यावर्षी शिबिराचे चौथे वर्ष असून या शिबिरामध्ये संपूर्ण महाराष्ट्र मधून 50 विद्यार्थी सहभागी होत आहे. यामध्ये गझल, मैफिल,कवी, साहित्य, विचार ज्येष्ठ समाजसेवकांचे व्याख्यान शिबिरात आयोजन पाच दिवस केले आहे. हे शिबिर २९ ते ३०डिसेंबर पर्यंत दिव्य सेवा प्रकल्प येथे होणार असून या शिबिराचा उद्घाटक समारंभ मोठ्या थाटात साजरा होणार आहे. या शिबिरामध्ये उद्घाटन प्रसंगी, बुलढाणा अर्बन चे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक भाईजी, आमदार संजय गायकवाड, जिल्हा चिकित्सक डॉ भागवत भुसारी,ऍड पुरुषोत्तम पडघान नागपूर, उपकार्यकारी अभियंता विवेक वाघ, डॉ गणेश गायकवाड,डॉ सौरभ संचेती डॉ. हरीश साखरे, गजानन जाधव कॉन्ट्रॅक्टर,हे उपस्थित राहणार आहे तर शिबिराचे मार्गदर्शक कार्यक्रमाला डॉ समाजसेवक अविनाश सावजी,
गझलकर गोपाल मापारी,कवी सत्य कुटे, नाझीम खान गझलकार, महेंद्र सौभाग्य, देवामृत च्या प्रिया जाधव यांचे मार्गदर्शन व्याख्यानासh विविध कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या शिबिरामध्ये गटचर्चा,बुद्धी सत्र, आदिवासी पाड्याला गावाला भेट, व्यक्ती कार्य नैसर्गिक भ्रमती कॅम्प फायर, अजिंठा लेणी चा अभ्यास असे आयुष्यामध्ये परिवर्तन घडाविनाऱ्या विषयावर शिबिरामध्ये चर्चा होणार आहे.
युवाकांमध्ये असलेले ज्ञान आणि माहितीचे संवर्धन व्हावे त्यांच्या क्षमता आणि काला कौशल्यचा विकास व्हावाआणि परिवर्तनशील विकासासाठी युवकांना योग्य दिशा मिळावी या उद्देशाने दिव्य सेवा प्रकल्पाने शिबिर आयोजित केले आहे. सध्याची शैक्षणिक,सामाजिक आर्थिक व आणि राजकीय परिस्थितीचा युवकांनी अभ्यास करावा विचाराचे आदानप्रदान व्हावे आणि त्यातून स्थानिक पातळीवर सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा हा शिबिराचा उद्देश आहे. या शिबिरातुनच सामाजिक कार्यकर्ते घडनार हेही विशेष अशे प्रतिपादन दिव्य सेवा प्रकल्प बुलडाणाचे संस्थापक अध्यक्ष अशोक काकडे यांनी केले आहे.
Tags
बुलडाणा