नववर्षाच्या पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सक्रीय;
अवैध मद्य विक्री, वाहतूक प्रकरणी तक्रार नोंदविण्याची आवाहन
बुलढाणा, दि. 30(जिमाका) : नववर्षाच्या आगमनाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील विविध भागात अवैध वाहतुक तसेच विक्री मोठ्या प्रमाणात होतात. अशा घटनाना प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत दि. 31 डिसेंबरपर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. तथापि कोणत्याही अनुज्ञप्तीमध्ये विना परवाना मद्यविक्री किंवा अल्पवयीन तरुणांना दारु उपलब्ध होत असल्यास अशावर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच नागरिकांनादेखील काही तक्रारी असल्यास विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ.पराग मो.नवलकर यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या गृह विभागाने नववर्षानिमित्त जिल्ह्यातील मद्यविक्री अनुज्ञप्त्या त्यांच्या निर्धारीत वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी उघड्या ठेवण्याबाबत परवानगी दिली आहे. त्यानुसार एफएल-2,एफएल-4,एफएल, बीआर-2 व सीएल-3 या अनुज्ञप्त्या त्यांच्या निर्धारित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी म्हणजेच दि. 31 डिसेंबर 2024 पासुन एफएल-2, एफएल व बीआर-2 अनुज्ञप्तीला दुसऱ्या दिवशी सकाळी 1 वाजेपर्यंत तर एफएल-3 अनुज्ञप्तीला दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजेपर्यंत अनुज्ञप्त्या उघड्या ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच कोणत्याही अनुज्ञप्तीमध्ये विना परवाना मद्यविक्री होऊ नये यासाठी संबंधित निरीक्षक, दुय्यम निरीक्षण यांच्यामार्फत संपूर्ण जिल्ह्यातील अनुज्ञप्तीधारकांना एकुण 60 हजार विदेशी एक दिवसीय मद्यसेवन परवाने वितरीत करण्यात आलेले आहे. कोणत्याही अनुज्ञप्ती विना परवाना मद्यविक्री चालु असल्याचे आढळल्यास तसेच अल्पवयीन तरुणांना दारु उपलब्ध होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला द्यावी.
नाताळ व नववर्ष आगमनाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क बुलढाणा कार्यालयाच्यावतीने अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्री वर प्रतिबंध घालण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील कार्यक्षेत्रीय अधिकारी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बुलढाणा, राज्य उत्पादन शुल्क देऊळगाव राजा व राज्य उत्पादन शुल्क खामगाव व राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक यांच्याकडून जिल्ह्यातील विविध हातभट्टी ठिकाण, अवैध मद्यविक्री केंद्रावर छापे टाकुन कारवाई करणे चालु आहे. तसेच नववर्षाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात येणाऱ्या पार्ट्या, हॉटेल्समध्ये होणारी मद्यविक्री यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असणार आहे.
Tags
जिमाका....