व्हाईस ऑफ मिडीया चिखली तालुका अध्यक्षपदी अमोल जोशी तर सचिव पदी ओमप्रकाश खत्री यांची निवड

व्हाईस ऑफ मिडीया चिखली तालुका कार्यकारीणीच्या बैठकीमध्ये सन 2025-27 या कार्यकाळासाठी अमोल जोशी यांची अध्यक्षपदी  तर सचिवपदी ओमप्रकाश खत्री यांची निवड करण्यात आली.
      स्थानिक विश्रामगृह येथे संपन्न झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी व्हाईस ऑफ मिडीयाचे राज्य संघटक  सुधीर चेके पाटील ,जिल्हा उपाध्यक्ष मंगेश पळसकर, टिव्ही जर्नलिस्ट जिल्हाध्यक्ष गोपाल तुपकर हे होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये ज्येष्ठ पत्रकार अनिल पळसकर,महेश वाधवाणी, प्रकाश मेहेत्रे,संजय खेडेकर यांच्यासह पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष  समाधान गाडेकर, उध्दव थुट्टे पाटील, शे. युसुफ उपस्थित होते.
नूतन कार्यकारीणी पुढील प्रमाणे अध्यक्ष अमोल जोशी, उपाध्यक्ष संजय भालेराव, तन्झीम हुसेन, सचिव ओमप्रकाश खत्री, सहसचिव विष्णु इंगळे, कोषाध्यक्ष विजय गोंधणे, संघटक बळीराम गुजाळ, सहसंघटक राजु खरात तर प्रसिध्दी प्रमुख पदी आकाश डोणगांवकर यांची निवड करण्यात आली.
मावळते अध्यक्ष युसुफ शेख यांनी आपल्या कार्यकाळात पत्रकार संघाच्या सदस्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. तर व्हाईस ऑफ मिडीयाचे राज्य संघटक  सुधीर चेके पाटील यांनी नुुतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. या बैठकीला पत्रकार संघाचे सदस्य अमोल खेकाळे,पवन लढ्ढा, विनोद खरे, पवन शिराळे, प्रफ्फुल देशमुख, काशिनाथ शेळके, शिवदास जाधव, रंगनाथ सावळे, रतन पठाडे आदि सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार गिरीष शिरभाते यांना श्रध्दांजली अर्पण करुन बैठकीचे समापन करण्यात आले.
Previous Post Next Post