Khabarbat News- संतनगरी शेगाव येथे जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे आयोजन

 


      शेगाव:- जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी, जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीजधाम यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळयाचे आयोजन दिनांक 14 व 15 जून 2026 रोजी श्री गणेश प्रस्थ मंगल कार्यालय,एम.एस.इ.बी.चौक, खामगाव रोड, शेगांव जि. बुलढाणा येथे सकाळी 9:00 वाजता आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती पश्चिम विदर्भ पीठ प्रमुख श्री. कुंडलिकराव वायभासे, व्यवस्थापक श्री सुरेश मोरे, पीठ प्रसिद्धी प्रमुख अमर इधोळ यांनी एका प्रसिध्दी प्रत्रकाद्वारे दिली आहे. 

     कार्यक्रमाच्या अनुषंगाने संस्थानाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात जसे की, ग्रामस्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रमांतर्गत इंग्रजी माध्यमांची मोफत शाळा, मोफत वेदपाठ शाळा, रक्तदान शिबिर, वैद्यकीय उपक्रमांतर्गत मोफत दवाखाना, मरणोत्तर देहदान, मोफत रुग्णवाहिका सेवा - महाराष्ट्रात विविध महामार्गावर 53 रुग्णवाहिका 24 तास अखंडपणे अपघातग्रस्तांच्या सेवेत कार्यरत आहेत. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन, महिला सक्षमीकरण अंतर्गत मोफत शिलाई यंत्र वाटप, मोफत घरघंटी वाटप, आपत्कालीन मदत उपक्रम, कायदेविषयक साक्षरता शिबिरे, रक्तदान शिबिरांतर्गत या वर्षी जानेवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून अवघ्या 15 दिवसांमध्ये 1,71,150 रक्त कुपिंकांचे संकलन करण्यात आले, ब्लड इन नीड, "एक पेड माँ के नाम" वृक्षारोपण उपक्रमांतर्गत 1,10,687 वृक्षारोपण नोव्हेंबर 2025,  महिन्यांमध्ये करण्यात आले, तसेच डिसेंबर 2025 या महिन्यांमध्ये 4,598 वनराई बंधारे बांधण्यात आले यांसारखे अनेक सेवा प्रकल्प सातत्याने राबवले जात आहेत.

      या कार्यक्रमासाठी पश्चिम विदर्भ पिठ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक भक्त, साधक, शिष्य, हितचिंतक यांनी दि.  14 व 15 जून 2026 रोजी जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रवचन व दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा. या कार्यक्रमात दिनांक 14 जून 2026 रोजी साधक दीक्षा व 15 जून 2026 रोजी उपासक दीक्षा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी उपासक दीक्षा व उपासक यांनी साधक दीक्षा घेण्यासाठी नोंदणी करावी. या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळयासाठी येणाऱ्या भाविकांसाठी कार्यक्रमाच्या दोनही दिवस महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी या महंन्मंगल समयी आपण सर्वांनी सहकुटुंब, सहपरिवार, आप्तइष्ट मित्रांसह उपस्थित राहून परमश्रद्धेय रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रवचन व दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन पीठ इंजिनिअर श्री दिपक चिंचोले, पीठ महिला प्र. व जिल्हा निरीक्षक सौ. लताताई चिंचोले, पीठ सदस्य श्री संतोष दसरे, जिल्हा अध्यक्ष श्री गणेश खडोळ, जि. म. अध्यक्षा सौं निंभोरे ताई, प्र. प्रमुख श्री गुजर तसेच पश्चिम विदर्भ पीठ समिती, जिल्हा तालुका व संतसंग सेवा समिती यांनी केले आहे.

Previous Post Next Post