Khabarbat News-नालंदा NIIRC विश्वविद्यालयाकडून प्रशांत पाटील यांना मानद डॉक्टरेट प्रदान

 


नितीन फुलझाडे 

बुलढाणा (महाराष्ट्र):- येथील प्रशांत पुरुषोत्तम ढोरे पाटील यांना मानसशास्त्रीय समुपदेशन,शिक्षण आणि टॅलेंट डेव्हलपमेंट या क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल Nalanda International Institute & Research Centre (नालंदा NIIRC युनिव्हर्सिटी) तर्फे मानद डॉक्टरेट (Honorary Doctorate) प्रदान करण्यात आली आहे.


ही मानद पदवी अधिकृतरित्या ऑनलाईन पद्धतीने प्रदान करण्यात आली असून, त्यामध्ये मानद डॉक्टरेटचे सर्टिफिकेट,ट्रॉफी आणि कॉन्व्होकेशन किट यांचा समावेश आहे. सर्टिफिकेट व ट्रॉफीसह घेतलेला त्यांचा छायाचित्र हा त्यांच्या कार्याचा गौरव करणारा अभिमानास्पद क्षण ठरत आहे.


प्रशांत ढोरे पाटील यांनी कोटा राजस्थान व बुलढाणा महाराष्ट्र येथे मानसशास्त्रीय समुपदेशन आणि शिक्षण क्षेत्रात केलेल्या प्रभावी कार्याची दखल तसेच त्यांनी लिखित "द सिक्रेट ऑफ हॅपिनेस" या अमेझॉन बेस्ट सेलर बुकची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आल्याचे सर्टिफिकेटमध्ये नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे,समाजासाठी दिल्या जाणाऱ्या योगदानाच्या आधारे दिली जाणारी ही मानद पदवी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता दर्शवते.

याच अनुषंगाने, Nalanda University तर्फे त्यांना मानसशास्त्र (Psychology) या विषयात डॉक्टर ऑफ सायकॉलॉजी (Hon. PhD) ही मानद उपाधी बहाल करण्यात आली आहे.

या सन्मानाबद्दल प्रशांत ढोरे पाटील यांनी नालंदा NIIRC युनिव्हर्सिटीचे आभार व्यक्त करत,भविष्यातही समाजहितासाठी मानसशास्त्रीय समुपदेशन आणि शिक्षण क्षेत्रात अधिक जबाबदारीने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.


हा सन्मान अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून,त्यांच्या कार्याची दखल घेतली जाणे ही अभिमानाची बाब मानली जात आहे.

Dr. Prashant Dhore Patil (Hon. PhD Psychology) यांचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला,कोटा जिल्हाध्यक्ष राकेश जैन तसेच ते कार्यरत असलेल्या रेझोनन्स कोचिंग कोटा व Eduway career solution सह सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्यावर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Previous Post Next Post