Khabarbat News -ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलच्या जिल्हाध्यक्षपदी श्याम देशमुख यांची फेरनिवड

 



 नितीन फुलझाडे 

 चिखली:- तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील रहिवासी असलेले पत्रकार श्याम देशमुख यांची भारतातील पहिले पत्रकार  मित्रांचे संघटन ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कल बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी फेरनिवड संघटनेच्या केंद्रीय व राज्य समितीच्या मान्यतेने करण्यात आली आहे.याआधी श्याम देशमुख हे ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष होते.पत्रकारांचे संघटन असलेली AJFC ही संघटना भारतातील पहिलीच केंद्रीय संघटना आहे. श्याम देशमुख यांच्या कार्याचे कौशल्य पाहून संस्थापक अध्यक्ष यासीन भाई पटेल यांनी त्यांची दुसऱ्यांदा बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड केली आहे. नियुक्ती पत्रावर केंद्रीय सचिव अतुल होनकळसे, विश्वस्त गणेश कोळी यांच्या सह्या असून पुढील वाटचालीस चांगल्या पद्धतीने काम करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहे.



             नियुक्ती पत्रात पुढे म्हटले आहे की संघटनेच्या ध्येयधोरणाच्या अधीन राहून आपल्या राज्य पातळीवरील कार्यक्षेत्रात संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने तसेच सभा,संमेलन,कार्यशाळा आयोजित करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करावे त्यासाठी आपणास केंद्रीय समितीचे मार्गदर्शन लाभेल.

            श्याम देशमुख हे दैनिक देशोन्नती वृत्तपत्राचे 1997 पासून अतिशय प्रामाणिकपणे पत्रकारिता करीत असून आतापर्यंत त्यांची निष्कलंक कामगिरी दिसून आली आहे. या नियुक्तीमुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


Previous Post Next Post