नितीन फुलझाडे
चिखली :-
नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कडून ज्या उमेदवारांनी निवडणूक लढली अशा उमेदवारांची व प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक स्थानिक हॉटेल स्वरांजली येथे संपन्न झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते मनोज दांडगे, शंतनू बोन्द्रे, प्राचार्य डॉ. निलेश गावंडे, तुषार बोंद्रे, संतोष परिहार, सुभाष देव्हडे, प्रा. राजू गवई, शेख राजू शेख रज्जाक, शेखर बोन्द्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.
याप्रसंगी बोलतांना मनोज दांडगे म्हणाले की, येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आपण सर्वांनी एकत्रितपणे संपूर्ण ताकतीने लढू. एकतेची ताकद येणाऱ्या 21 तारखेला आपल्याला दिसणार आहे असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना ऐन वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपणा सर्वांनवर विश्वास ठेवला. त्यामुळे भविष्यात त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची खबरदारी आपण सर्वांनी घेऊया असे म्हणून भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात चिखली मतदार संघात मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी श्री शंतनु बोंद्रे व श्री संतोष परिहार यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांनी देखील आपले अनुभव सांगितले.
या आढावा बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पक्ष संघटन मजबूत करणे, कार्यकत्यांमध्ये समन्वय साधणे तसेच आगामी काळातील राजकीय घडामोडींवर चर्चा करून पक्षाच्या आतापर्यंतच्या कामकाजाचा आढावा घेऊन पुढील रणनीती ठरवण्यात आली. तसेच चिखली शहरातील पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी कार्यकत्यांचे मत, सूचना आणि अडचणी जाणून घेण्यात आल्या व आगामी उपक्रमांबाचत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच 21 तारखेला होणाऱ्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीच्या अनुषंगाने सुद्धा चर्चा करण्यात आली.
या बैठकीला संतोष लोखंडे, रिकी काकडे, विलास जावळे, शेख तौफिक शेख करामत, राजेश मोरे, श्रीकृष्ण ठेंग, शेख शकील शेख मतीन, व्यंकटेश बोन्द्रे, श्याम शिंगणे, सचिन शेटे, शुभम मोरगंजे, सुनील सुरडकर, रवींद्र वानखडे, प्रदीप वाकोडे, सिद्धार्थ चव्हाण, मोहन गवई, अरमान पठाण, श्रीकांत अवसरमोल, फिरोझ खान, गजानन खवसे, प्रफुल्ल भुतेकर, विशाल भुतेकर, समाधान झगरे, अमोल सोनुने, साहिल सौदागर, शेख अमीन, प्रदीप गवारे, राजू नरवाडे, भारत सरकटे, राहुल वानखडे, विजय सोळंकी, कृष्ण गोलांडे, रवींद्र शेटे, ऋषिकेश शिंदे, कृष्ण ठाकरे, राजेश चुनावाले, रवी शिराळे, अजय शिंगणे, उमेश खरे, तसेच सर्व पदाधिकारी व युवा कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुषार बोंद्रे यांनी केले. सूत्रसंचालन शेखर बोंद्रे यांनी केले तर आभार संतोष लोखंडे यांनी मानले.
Tags
खबरबात स्पेशल
