नितीन फुलझाडे
चिखली : जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्रातील एक धडाडीचे नाव असलेले पत्रकार संतोष लोखंडे यांनी चिखली नगर परिषद निवडणुकीत आपले राजकीय पदार्पण केले असुन चिखली नगर परिषद निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक ८ ब या सर्वसाधारण जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
गत २५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले संतोष लोखंडे हे एक अनुभवी व्यक्तिमत्व आहे. यासोबतच ते माजी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी शिंगणे यांचे स्विय्य सहाय्यक म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे त्यांना प्रशासकीय कामकाजाचा तगडा अनुभव आहे त्यामुळे त्यांची उमेदवारी अधिक लक्षवेधी ठरली आहे.
पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना राज्य शासनाचा मानाचा 'पु. ल. देशपांडे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार' प्राप्त झाला आहे. वृत्तवाहिनीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यातील एका प्रतिनिधीला दरवर्षी राज्य शासनाच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. २०१५ मध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संतोष लोखंडे यांना हा बहुमान प्रदान करण्यात आला होता.
अभ्यासू आणि गरजूंच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून संतोष लोखंडे यांची ओळख आहे.
सामाजिक आणि प्रशासकीय अनुभव असलेल्या संतोष लोखंडे यांना चिखली येथील प्रभाग ८ ब चे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर पसंती दिली असुन ३ डिसेंबर ला मतदार त्यांच्या वर विश्वास ठेवुन त्यांना नगरपालिका प्रशासनाकडु जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी न.प.सभागृहात पाठवतील असा आत्मविश्वास संतोष लोखंडे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर व्यक्त केला.
