*खड्डे चुकवितांना मोठा अपघात होण्याची शक्यता*
नितीन फुलझाडे
*चिखली:- चिखली-बुलढाणा-मलकापूर हा मार्ग दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. वाढलेली मोठ्या प्रमाणात रहदारी, अरुंद रस्ता तसेच रस्त्याने पडलेले मोठमोठे खड्डे यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी याबाबत आम्ही नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध करीत असतोच.
हा मार्ग बीओटी तत्त्वावर असून याची देखभाल दुरुस्ती वेळोवेळी व्हावी अशा नागरिकांची अपेक्षा असते जेणेकरून दुर्घटना टाळता येतील.
चिखली बुलढाणा रस्त्यावर तर खूप मोठमोठे खड्डे पडले आहेत, ते चुकीवताना वाहनधारक नाईलाजास्तव अक्षरशः या कडेवरून त्या कडेवर जातात.या मुख्य रस्त्याची खड्ड्यांमुळे जणुकाही चाळणीच झाली आहे.तरी या जीवघेण्या समस्येकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन तात्काळ उपयोजना करावी अशी नागरिकांची मागणी आहे.*
खामगाव चौफुली ते राऊतवाड रस्ता अक्षरशः खड्डेमय झाला असून तात्काळ डागडुजी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
