*दीपक चिंचोले यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न*




*तत्परतेने कामे मार्गी लावणारा अधिकारी म्हणजे दीपक चिंचोले- खा.प्रतापराव जाधव राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) केंद्रीय आयुष मंत्रालय 

*एवढा मोठा लोकसंग्रह हीच चिंचोले साहेब यांच्या कामाची पावती-खा. प्रतापराव जाधव राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) केंद्रीय आयुष मंत्रालय *



*नितीन फुलझाडे*

*चिखली:-सार्वजनिक बांधकाम उपविभाग चिखली येथील कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर उपविभागीय अधिकारी दीपक दगडू चिंचोले हे नियत वयोमानानुसार 31 ऑगस्ट 2025 रोजी सेवानिवृत्ती झाले.त्यांच्या  दिमागदार सेवापूर्ती कार्यक्रमाचे आयोजन त्यांची मुले,सुना,चिंचोले परिवार व मित्रपरिवार यांनी बुलढाणा येथील बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी क्लब मध्ये 5 सप्टेंबर 2025 रोज शुक्रवारला आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी राजकीय, शैक्षणिक,आरोग्य तथा सर्वच क्षेत्रातील मातब्बर मंडळीने आवर्जून उपस्थिती लावली होती.  सौं. लता दिपक चिंचोले जनम प्रवचनकार जिल्हा निरीक्षक रामानंदाचार्य संप्रदाय तसेच पीठ महिला निरीक्षक व उपविभागीय अधिकारी दीपक दगडू चिंचोले यांचा सर्व मान्यवरांनी तथा उपस्थित आणि यथोचित सत्कार केला व त्यांच्या भावी निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.हा चिंचोले साहेबांचा सेवापूर्ती सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा झाला असल्याचे उपस्थितांमध्ये चर्चा होती.तसेच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या मान्यवरांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाच्या समारोपापर्यंत म्हणजे कार्यक्रम सुरू झाल्यापासून तब्बल पाच ते सहा तास आपली उपस्थिती लावल्याने "चिंचोले साहेब यांच्या कार्यालयीन कामातून,बोलण्यातून, वागण्यातून,समाजकार्यातून एवढा मोठा लोकसंग्रह ते जमा करू शकले हीच त्यांच्या कार्याची पावती आहे" असे गौरवउद्गार केंद्रीय आयुष मंत्री खा. प्रतापराव जाधव यांनी यावेळी आवर्जून काढले.*


*सदरील सेवापूर्ती कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री वसंतराव चिंचोले से. नि. उपसंचालक आरोग्य तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये श्री प्रतापरावजी जाधव राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) केंद्रीय आयुष मंत्रालय,श्री संजूभाऊ गायकवाड आमदार बुलढाणा मतदारसंघ,श्री विजयराज शिंदे भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार,श्री अंकुश रावजी पडघान सौ श्वेता ताई महाले आमदार यांचे वडील,श्री जितेंद्र काळे कार्यकारी अभियंता सा.बां विभाग, बुलढाणा,श्री रविकांत काळवाघे से. नि. कार्यकारी अभियंता सा बां विभाग,श्री गणेश भगुरे उपअभियंता, सा. बां. उपविभाग, चिखली,सौ मालतीताई शेळके अध्यक्ष राजश्री शाहु पथसंस्था, बुलढाणा,श्री गुलाबराव शेळके अध्यक्ष अभियंता सेल भाजपा,श्री नरेश भाऊ शेळके जिल्हा परिषद सदस्य,श्री संदीप शेळके राजश्री शाहू पतसंस्था बुलढाणा, श्री गणेश खडोळ जिल्हाध्यक्ष दक्षिण बुलढाणा रामानंदाचार्य  संप्रदाय,श्री नंदू  कऱ्हाडे उपाध्यक्ष उबाठा,श्री नरवाडे साहेब सरपंच सावळी,श्री राजेश्वर उबरहंडे प्राचार्य बी एम एस कॉलेज बुलढाणा सपत्नीक  उपस्थित होते. सदरील सेवापूर्ती कार्यक्रमाचा अल्प परिचय डॉ. सुरज चिंचोले,प्रास्ताविक श्री सुधाकर चिंचोले  सर से नी प्राचार्य,सूत्रसंचालन श्री जाधव सर,आभार प्रदर्शन डॉक्टर शिवानी अनिकेत चिंचोले यांनी केले.*हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर सुरज चिंचोले,डॉक्टर सौ प्रियंका चिंचोले, डॉक्टर श्री अनिकेत चिंचोले व डॉक्टर शिवानी चिंचोले तसेच चिंचोले परिवार यांनी खुप सुंदर असं आयोजन केलं होतं.या कार्यक्रमाकरिता मोठा असा आप्तपरिवार तसेच नातेवाईक, सहकारी,हितचिंतक व बंधू भगिनी उपस्थित होते.*




*चिंचोले साहेब यांच्या सेवापूर्ती दरम्यान विविध मान्यवरांनी मांडलेले विचार*


*खा.श्री.प्रतापराव जाधव राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) केंद्रीय आयुष मंत्रालय*

            *नोकरी मधून 58 व्या वर्षी सेवानिवृत्त झाले याचा अर्थ आपण पुढे काही करू शकत नाही असा नसून आता आरोग्य क्षेत्रात एवढ्या सुधारणा झालेल्या आहेत की माणसाचे वयोमान वाढले आहे, त्याला कारण म्हणजे मिळणाऱ्या विविध अत्यावश्यक आरोग्य सेवा त्यामुळे चिंचोले साहेब यांनी भविष्यात समाजकार्य,धार्मिक कार्य करत राहावे.ते बांधकाम विभागात असल्याने नेहमी कामानिमित्त त्यांच्याशी संपर्क आला असून वेळोवेळी त्यांनी सकारात्मक व चांगले काम केले आहे.तत्परतेने कामे मार्गे लावणारा अधिकारी तसेच आपल्या कार्यातून मोठा लोकसंग्रह निर्माण करणारे चिंचोले होय.त्यांना भावी आयुष्याच्या आरोग्यदायी शुभेच्छा.*



*श्री.विजयराज शिंदे भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार*


 *आता तुम्ही कार्यमुक्त झालेले असल्याने आमच्या कडे या तुमच्यासारख्या व्यक्तीला एक चांगला स्टेज आमच्या पक्षामार्फत मिळेल व आपल्या अनुभवाचा फायदा पक्षाला होईल.आपणास निरोगी दीर्घायुष्याच्या शुभकामना*



*सौ लता दीपक चिंचोले* *(जनम प्रवचनकार जिल्हा निरीक्षक श्री संप्रदाय तसेच पीठ महिला निरीक्षक)*


*चिंचोले साहेब यांनी कार्य व अध्यात्म याची जोड घालून आपल्या आयुष्यात यश संपादन केल्याचे सांगितले. तसेच खडतर प्रवासात सकारात्मक विचारांनी पुढे जात राहिल्याने आज हे वैभव प्राप्त झाल्याचे झाले, तसेच आमचे श्रद्धास्थान अनंत श्री विभूषित जगद्गुरु आनंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराज व गजानन महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आमच्या परिवाराची भरभराटी झाली.आमच्या आयुष्याचं चीज झालं. यानंतरही आम्ही दोघेही समाजकार्य,धार्मिक कार्य अविरत करत राहू हीच यावेळी इच्छा व्यक्त केली*



*श्री दीपक दगडू जी चिंचोले उपविभागीय अधिकारी*


*सत्काराला उत्तर देताना सांगितले की सर्व सहकारी व कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी सहकार्य केल्यामुळे जीवनातला हा यशाचा टप्पा गाठता आला, तसेच या यशामागे माझी पत्नी सौ लता हिचा सिंहाचा वाटा आहे तिने आयुष्यात समर्थ साथ दिल्यामुळे हे दिवस आमच्या जीवनात येऊ शकले.माझ्या कार्यकाळात नकळत माझ्याकडून कुणाचे मन दुखले असेल त्याबद्दल क्षमा असावी. पुढील आयुष्यात आपल्या सगळ्याच्या सहकाऱ्यांनी समाजकारण,धार्मिक कार्यामध्ये भाग घेऊन जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करेल,इतक्या मोठ्या प्रमाणात आपण सर्व माझ्या सेवापूर्ती सोहळ्याला आल्याबद्दल खूप खूप आभार, असेच प्रेम चिंचोले परिवार राहो हीच मनोकामना व सर्वांचे आभार*



*श्री वसंतराव चिंचोले (सेवानिवृत्त उपसंचालक आरोग्य विभाग)*


*अध्यक्षीय भाषणात जास्त वेळ न घेता कार्यक्रमाला खूप उशीर झाला असल्याने प्रथमच दिलगिरी व्यक्त करतो, एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वांनी सेवापूर्ती कार्यक्रमासाठी उपस्थिती लावल्याने सर्वांचे आभार मानतो व या कार्यक्रमासाठी परिवारातील सदस्यांनी जी मेहनत घेतली व उत्कृष्ट नियोजन केले याबद्दल त्यांचे कौतुक करतो, तसेच दोघांनाही निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो.*



*अंकुशराव पडघान(सो श्वेताताई महाले पाटील यांचे वडील),कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा जितेंद्र काळे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग रविकांत काळवाघे, उपविभागीय उप अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग चिखली श्री गणेश भगुरे,राजश्री शाहू पतसंस्था बुलढाणा अध्यक्ष सौ मालती ताई शेळके, अध्यक्ष अभियंता सेल भाजपा गुलाबराव शेळके, जिल्हा परिषद सदस्य नरेश भाऊ शेळके, राजश्री शाहू महाराज पतसंस्था बुलढाणा संदीप शेळके,जिल्हाध्यक्ष दक्षिण बुलढाणा रामानंदचार्य संप्रदाय गणेश खडोळ,उपाध्यक्ष उबाठा नंदू कऱ्हाडे,सरपंच सावळी नरवाडे साहेब, तथा प्राचार्य एम एस कॉलेज बुलढाणा राजेश्वर उबरहंडे ,यांनी यथोचित आपली मनोगते व्यक्त करीत उपविभागीय अधिकारी दीपक दगडूजी चिंचोले साहेब तथा त्यांच्या पत्नी सौ लता दीपक चिंचोले यांना भावी सुख समाधानी आणि निरोगी आयुष्याच्या भरभरून शुभेच्छा दिल्या*


Previous Post Next Post