कल्पतरू पुस्तक पेढीच्या माध्यमातून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

 



कल्पतरू पुस्तक पेढीच्या माध्यमातून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप



नितीन फुलझाडे 

चिखली तालुका व परिसरात अनेक वर्षांपासून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण,पुस्तके,स्पर्धा परीक्षा साहित्य वाटप करण्यात येते. या वर्षी सुद्धा कल्पतरू पुस्तक पेढी अध्यक्ष विनोद मोटे तसेच सचिव संतोष यांच्या अथक प्रयत्नातून ग्रामीण भागातील शाळेतील होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत वाटप करण्यात आली.या मदतीत मुंबई चे मध्य रेल सांस्कृतिक अकादमी कलाकारांचा मोलाचा वाटा आहे.कल्पतरू पुस्तक पेढी  कार्याच्या माध्यमातून अनेक उपक्रम अनेक वर्षांपासून राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अलीकडेच, अंचरवाडी तालुका चिखली येथे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच मानमोडी घाणमोडी तालुका चिखली गावातील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.


बुलढाणा-अकोला सीमेवरील डोंगर रानात वसलेल्या पिंपरी धनगर (ता. खामगाव) या दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांना देखील स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.


या उपक्रमात कल्पतरू पुस्तक पेढी अध्यक्ष विनोद मोटे उपाध्यक्ष गोपाल चव्हाण व सचिव संतोष गवारे यांच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


या उपक्रमामुळे दुर्गम भागातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्रात मदत पुरविली जाईल तसेच आपल्या कडे असलेली जुनी पुस्तके शैक्षणिक साहित्य कल्पतरूला दान करावे जेणे करून ग्रामीण भागातील होतकरू मुलांपर्यंत ते पोहचविले जाईल असे आवाहन कल्पतरू पेढी च्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post Next Post