खामगांव - जिल्हा परिषद हायस्कूल रोहणा येथिल माजी विद्यार्थ्यांनी सुमारे २८ वर्षांनी एकत्रित येऊन आपल्याला घडविणारे लाडके शिक्षक तथा आजचे मंगरूळ नवघरे येथिल कर्तव्यदक्ष प्राचार्य वसंतराव गाडेकर गुरुजी यांचा सन्मान करून आपल्या गुरुजनांप्रती आदरभाव व कृतज्ञता व्यक्त करीत गुरुशिष्य परंपरा अबाधित राखून भारतीय सुसंस्कृतीचे विलोभनीय दर्शन दिले आहे.
याप्रसंगी विशेष निमंत्रित म्हणून सेवानिवृत्त शिक्षक पी. डी . देशमुख , एस . डी . पाटील , बी . एस . पुंडकर व रोहणा येथिल मुख्याध्यापिका सौ कोळी मॅडम यांचा यथोचित सत्कार करण्यात आला व आपल्या शाळेसाठी आर . ओ . फिल्टर सप्रेम भेट देण्यात आला .
याबाबत असे की , जिल्हा परिषद हायस्कूल रोहणा येथे सन 1992 ते 1997 या दरम्यान वर्ग 5 ते 10 पर्यंत एका वर्गात शिकलेल्या मुली व मुले राणा उमेश रामसिंग इंगळे यांच्या पुढाकाराने तब्बल 28 वर्षानंतर एकत्रित आले . यापैकी अनेकजण नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने पुणे , आळंदी, मुंबई, नागपूर येथे वास्तव्याला आहेत तरीही केवळ आपले आदरणीय गुरुजन , मित्र व शाळेच्या प्रेमापोटी सर्व एकत्रित जमले व एक दिवसाची शाळा भरविली यात प्रामुख्याने
सौ मालू टाले देशमुख , रोशनी जोशी , गीता सावंग , राखी अग्रवाल , सुनंदा खंडारे बोबडे , लता इंगळे , लिला तायडे , रुख्मीणी वाकुडकर , रेखा राठोड विमल इंगळे , रामेश्वर वाकुडकर , राजू खंडारे , संघपाल सावंग , प्रल्हाद घोंगे , किसन भोपळे , विजयसिंग राजपूत , गोपाल कळमकार , गजानन तायडे , अरुण तायडे , गुलाबराव वाकुडकार , गौतम नाईक , ईश्वरसिंग इंगळे , सुनिल येऊतकर , दत्ता वाकुडकर , विजयसिंग सोळंके , रामेश्वर क्षिरसागर , संतोष शेले, राजेश बोदडे , निळकंठ कुन्हाळ , ज्ञानेश्वर सातव , संतोष उमाळे , ज्ञानेश्वर बोरसे , सारंगधर वाकुडकर , महादेव ठाकरे , राजेंद्र बोचरे , विनोद इंगळे , परशराम कळसकार, सिध्देश्वर शेलकर , विजय इंगळे या माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राणा उमेश राजपूत मित्र मंडळाने परिश्रम घेतले .
