सैनिक व पोलिसांच्या हस्ते ध्वजारोजन...
नितीन फुलझाडे
ज्ञानदेवराव बापू दांडगे विद्यालयामध्ये स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या शाळेने इतिहास, संस्कृती आणि शिक्षणाचा अनोखा मिलाप साधत राष्ट्रप्रेमाचा आदर्श निर्माण केला.कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली, ज्यात संस्थेच्या आधारवड वत्सलाआई दांडगे, ठाणेदार श्री. प्रमोद भोस साहेब, सैनिक बळीरामजी सिनकर, श्री निलेशजी सावळे, धाड पोलीस स्टेशनचे माळी साहेब, शेळके साहेब श्री. संतोष दांडगे, सौ.सोनालीताई दांडगे यांच्यासह आदी मान्यवर अतिथींनी सहभाग घेतला.
तिरंग्याचे ध्वजारोहण करून राष्ट्रगीत गायले गेले, ज्यामुळे सर्वांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत झाली.
महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्यानंतर, विद्यार्थ्यांनी मेरे देश की धरती, तेरे मिट्टी मे मिल जावा,कर चले हम फिदा यासारखी देशभक्तीपर गाणी सादर केली. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, ज्यात देशभक्तीपर नाटक, नृत्य आणि समूहगीत यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डवले यांनी केले.
दांडगे शैक्षणिक संकुल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन संस्थाध्यक्ष मनोज दांडगे यांनी केले.
सहाय्यक शिक्षक संजय कुन्नर यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासावर भाषण दिले आणि विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाची आठवण करून देत आजच्या पिढीला त्यांच्या स्वप्नांसाठी कार्य करण्याची प्रेरणा दिली.
या विशेष दिवशी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. त्यांनी देशभक्तीपर भावना व्यक्त केल्या.नृत्य,गाणे,नाटक,कविता वाचन,भाषणे विशेषतः विविध घटनांवर आधारित नाट्यप्रस्तुतीने सर्वांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक राजेंद्र गायकवाड तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य अमोल जाधव यांनी केले.
याप्रसंगी दांडगे शैक्षणिक संकुलाचे समन्वयक तथा प्राचार्य श्री.डवले सर, दांडगे महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.पांडे सर तसेच दांडगे नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य श्री.पांडव सर, विद्यालयाचे उपप्राचार्य यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते...
