गट ग्रामपंचायत शेलगाव जहांगीर-आण्वी येथील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी

 



नितीन फुलझाडे 

शेलगाव जहांगीर:- गट ग्रामपंचायत शेलगाव जहांगीर-आण्वी येथे गेल्या दोन वर्षापासून सरपंच व सचिव यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठीचे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती चिखली यांना उपसरपंच व सदस्य यांनी 4 ऑगस्ट रोजी दिले आहे. 

 निवेदनात म्हटले आहे की गेल्या दोन वर्षापासून सरपंच व सचिव हे कोणालाही विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत आहेत. त्यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे. तसेच सदर प्रकरणी तात्काळ चौकशी करून सरपंच, सचिव यांचे पद काढण्यात यावे व दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. या निवेदनावर गट ग्रामपंचायत शेलगाव जहांगीर-आण्वी येथील उपसरपंच सविता विठ्ठल खाडे, सदस्य इंदू जीवन पंडागळे, पूजा सचिन बडगे, गजानन उत्तमराव पवार, रुपराव शेषराव ठेंग यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सदरील निवेदनाच्या प्रतिलिपी माननीय नामदार जयकुमार गोरे, ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, जिल्हा परिषद बुलढाणा यांना देण्यात आल्या आहेत.

Previous Post Next Post