*"हर घर तिरंगा-2025" अभियानास सुरुवात*

 





*नितीन फुलझाडे*

*चिखली:- *स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाकडून सन २०२२ पासून "हर घर तिरंगा” ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे तसेच भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढवणे, ही सदर उपक्रम राबविण्यामागील मूळ कल्पना आहे. सदर उपक्रम भारताच्या राष्ट्रध्वजासोबत वैयक्तिक बंध निर्माण करण्यावर आधारित आहे. “हर घर तिरंगा” मोहीम लोक चळवळ बनली असून या मोहिमेंतर्गत महाराष्ट्र राज्याने लक्षवेधी कामगिरी केलेली आहे. सन २०२५ मध्ये सुद्धा सदर मोहीम मोठ्या उत्साहात राबविण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे.*



         *त्यानुषंगाने सन २०२५ मध्ये "हर घर तिरंगा" मोहीम केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे दि.२ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीमध्ये तीन टप्प्यामध्ये राबविण्याचे नियोजन राज्य* *शासनामार्फत करण्यात आले आहे. राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थानी मोहिमेच्या* *अंमलबजावणीकरीता केंद्र व राज्य शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून खालीलप्रमाणे नमूद सर्व उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी तात्काळ नियोजन करण्यात यावे अशा सूचना केंद्र शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या आहे.* 



*या अभियानामध्ये टप्पा क्रमांक एक मध्ये दिनांक 2 ऑगस्ट ते 8 ऑगस्टपर्यंत पुढील बाबीवर लक्ष केंद्रित करून नागरी संस्थानिक स्वराज्य संस्थांनी विविध कार्यक्रमांचे नियोजन करावे असे कळविले आहे यामध्ये शाळेच्या भिंती सजविणे, तिरंगा प्रदर्शन आयोजन, तिरंगा रांगोळी स्पर्धा, तिरंगा राखी बनवण्याच्या स्पर्धा व कार्यशाळा, तिरंगा विणकाम व धागे सार्वजनिक प्रदर्शन,तिरंग्याच्या भावनेचा गौरव करण्यासाठी भारतीय जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पत्र लेखन अभियान, तिरंगा प्रश्नमंजुषा, हरघर तिरंगा 2025 मोहीम स्वयंसेवक, #harghartiranga 2025 या हॅशटॅगसह सोशल मीडियावर फोटो शेअर करणे, हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता स्वतंत्र जागा उत्सव,स्वच्छता के संग, विशेष आयोजन: सार्वजनिक ठिकाणी तिरंगा प्रकाशयोजना व सजावट यांचा समावेश राहणार आहे.*



*टप्पा क्रमांक दोन मध्ये आठ ऑगस्ट ते 12 ऑगस्ट पर्यंत तिरंगा महोत्सव, तिरंगा मेळा, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा बाईक रॅली आणि तिरंगा सायकल रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा विक्री व वितरण, प्रसार माध्यम व सोशल मीडिया प्रचार, तिरंगा दौड आणि मॅरेथॉन, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फीज व तिरंगा ट्रिब्यूट इत्यादी उपक्रमांचा समावेश राहणार आहे व  टप्पा क्रमांक तीन मध्ये 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान स्वतंत्र दिन समारंभ, ध्वजारोहण व कार्यक्रम यामध्ये स्वातंत्र्य दिन समारंभाचे आयोजन करणे, घरोघरी, कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी तिरंगा फडकवणे, कार्यालय/वाहने सजविणे, तिरंगा सेल्फी*

*www.harghartiranga.com या वेबसाईटवर अपलोड करणे इत्यादींचा समावेश राहणार आहे.*





*चिखली नगर परिषदेच्या वतीने आयोजन* 


*तिरंगा रॅलीने चिखली शहर दुमदुमले*


             *शासनाच्या आदेशित सूचनेप्रमाणे नगरपरिषद चिखलीच्या माध्यमातून दिनांक 8 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 11 वाजे दरम्यान शहरातील सर्व माध्यमिक शाळांचे विद्यार्थी यांच्या समवेत सायकल रॅली व बाईक तिरंगा रॅली चे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी "हर घर तिरंगा-घर घर तिरंगा" या घोषणा देऊन चिखली शहरामध्ये जनजागृती करून आपल्या देशाच्या प्रति देशभक्ती प्रेम जागृत करण्याचे काम केले. यावेळी रॅली शहरातील बस स्थानक परिसर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, जयस्तंभ चौक,बैलजोडी चौक ते तालुका क्रीडा संकुल अशा मार्गाने रॅलीचे प्रस्थान झाले व क्रीडा संकुल येथे समारोप करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती बाबत पथनाट्य छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे सादर केले. यावेळी तिरंगा रॅलीने संपूर्ण चिखली शहर दुमदुमले होते.कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत व राज्य गीत आणि स्वच्छतेची शपथ देऊन समारोप करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रशांत बिडगर यांच्या मार्गदर्शनात, नगरपरिषद कार्यालय अधीक्षक अर्जुन इंगळे,आस्थापना प्रमुख सौ. तायडे मॅडम, प्रशासनाधिकारी शकील खान सर तसेच सर्व अधिकारी कर्मचारी,आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी, प्राचार्य, शिक्षक वृंद, पोलीस प्रशासन व शालेय विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

Previous Post Next Post