गरजू विद्यार्थ्यांसाठी सहकार्य फाउंडेशनचा शालेय साहित्य वाटप उपक्रम

 


नितीन फुलझाडे 
चिखली, दि. 8 ऑगस्ट :
सहकार्य फाउंडेशन मागील 10 वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असून, विशेषतः गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवून त्यांचा शैक्षणिक प्रवास सुलभ करण्याचे कार्य सातत्याने करत आहे.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून दिनांक 8 ऑगस्ट रोजी स्थानिक नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक, चिखली येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शालेय साहित्य वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन चिखली नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक अर्जुनराव इंगळे, मुख्य लेखापाल तुळशीदासजी बनसोडे व प्राचार्य सुरेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रास्ताविक सहकार्य फाउंडेशनचे सदस्य नितीन वराडे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात अर्जुनराव इंगळे यांनी सहकार्य फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत, “फाउंडेशनला गरज भासल्यास नगरपरिषद प्रशासन सदैव मदतीस तयार आहे,” असे आश्वासन दिले. आभार प्रदर्शन हुशे सर यांनी केले.

कार्यक्रमास मुख्याध्यापक ढंगारी सर, जाधव सर तसेच सहकार्य फाउंडेशनचे सुचित भराड, श्रीकांत सोळंकी, नितीन जांगिड, आशिष गोलाणी, सागर भोलाने, चेतन नागवाणी, वैभव हाके, संजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते
Previous Post Next Post