संत निरंकारी मिशनच्या वननेस वन प्रकल्पांतर्गत चिखली न्यायालयांच्या आवारात 500 झाडांची लागवड





देशभरात 600 ठिकाणी वृक्षारोपण

नितीन फुलझाडे 

चिखली/ (जि.बुलढाणा) 18 ऑगस्ट, 2025 : निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन मार्गदर्शनानुसार भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात संत निरंकारी मिशनतर्फे सुरु करण्यात आलेल्या ‘वननेस वन’ या नागरी समूह वृक्षारोपण कार्यक्रमा अंतर्गत दिनांक 17 ऑगस्ट रोजी देशभरात 600 पेक्षा अधिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. याच कार्यक्रमा अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील चिखली  येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयांच्या आवारात नियोजनबद्ध पद्धतीने वृक्षारोपण करत 500 झाडांची लागवड करण्यात आली आहे. संत निरंकारी मिशनच्या स्थानिक शाखांच्या वतीने या झाडांचे सलग तीन वर्षे संगोपनदेखील करण्यात येणार आहे.

चिखली येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या आवारात 17 ऑगस्ट रोजी 500 झाडे लावण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यात आले. चिखली येथील वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ माननीय श्री.आय.ए.वाय.ए.खान, दिवाणी न्यायाधीश (क.स्त.) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, चिखली यांच्या शुभहस्ते 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित वकील मंडळी व संत निरंकारी मिशनचे सेवादल तसेच भक्तगण यांना संबोधित करताना माननीय न्यायाधीय महोदयांनी संत निरंकारी मिशनतर्फे राबविण्यात येत असलेल्या या पर्यावरणपूरक कार्यक्रमाची स्तुती केली इतरांनीही अशा कार्याचे अनुकरण करायला हवे, असे प्रतिपादन केले. तत्पूर्वी मिशनचे चिखली येथील सेक्टर संयोजक श्री.शालिकराम चवरे यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाची पार्श्वभूमी व उद्देश समजावून सांगितला तर मिशनचे प्रसिद्ध मराठी लेखक श्री.स.वि.लव्हटे यांनी संत निरंकारी मिशनची विचारधारा आणि वैश्विक स्तरावरील कार्याविषयी उपस्थितांना अवगत केले. 

या वृक्षारोपन कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन वृक्षारोपणात भाग घेतला. मान्यवरांमध्ये गट विकास अधिकारी, पंचायत समिती चिखली श्री.समाधान वाघ, सहाय्यक गट विकास अधिकारी श्री.गजानन पोपळे महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी राजेश वाघ विस्तार अधिकारी नितीन शेळके, विस्तार अधिकारी विशाल वैराळ, न्यायालया चे वरिष्ठ अधीक्षक गजानन जी मोहरील तसेच स्थानिक वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सागर सोनाळकर यांचा समावेश होता. या सोबतच सेवादल संचालक दिपक इंगळे, सेवादल संचलिका द्वारका काळे, सेवादल शिक्षिका किरण भालेराव, सेवादल शिक्षक शंकर इंगळे, सहाय्यक सेवादल शिक्षक आदित्य चव्हाण, जेष्ठ विधी तज्ञ अँड विजयकुमार कस्तुरे, अँड यंडाईत, अँड. अनिल कऱ्हाडे अँड रुपाली चौधरी, अशोक आयलाणी, रुपराव इंगळे, हरिदास इंगळे, मीडिया सहाय्यक विनोद चव्हाण, भानखेड चे पोलीस पाटील डॉ. मिलिंद इंगळे,गोकुळ शिंगणे,ओम नेमाने,डिंगबर पाटोळे, मदन शेळके, आनंद झिणे,बबनराव चव्हाण, अशोक हिवरे, श्रीराम फोलाणे,प्रदीप बांबल डॉ. प्रवीण वतारी,डॉ भूषण इंगळे,गोपाल चौधरी,तेजराव गायकवाड,दत्तात्रय हिरगुडे, गणेश भिवटे, दिलीप इंगळे,सुरेश खुर्दे, गजानन इंगळे, शरद सोनुने,आकाश गायकवाड,स्वप्नील जैवाळ,राम भालेराव आत्माराम रताळे,ओम नेमाने,दगडूबा जाधव मालती चवरे, विश्रांती इंगळे, स्वाती काळे या सह अनेक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते

स्थानिक सेक्टर संयोजक यांच्या देखरेखीखाली स्थानिक सेवादल युनिटच्या अधिकाऱ्यांनी आणि पुरुष व महिला स्वयंसेवकांनी आठ ते दहा दिवस मेहनत घेऊन या वृक्षारोपण कार्यक्रमाची सुंदर पूर्वतयारी केली होती.


Previous Post Next Post