नितीन फुलझाडे
चिखली, बुलडाणा :- माळी समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते दिपकराजे सुरेश देशमाने यांची दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष रमेश हिरळकार यांच्या सुचनेनुसार बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजय राजाभाऊ खरात यांच्या हस्ते चिखली उपशहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
समाजात जागृतीचे काम, समाजाला योग्य दिशा देण्याचे काम आपण करत आहात आपल्या हातून महात्मा फुलेंच्या सत्यशोधक मार्गाचे मोठ्या प्रमाणावर कार्य व्हावे, तसेच माळी समाजाचे संघटन गावागावात व जिल्ह्यात मजबूत व्हावे यासाठी आपली निवड करण्यात आली असल्याचे नियुक्ती पत्रात म्हटले आहे. नियुक्तीपत्र देते वेळी अखिल भारतीय माळी महासंघाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजय राजाभाऊ खरात, अभय तायडे, राजेश मेहेत्रे, रामभाऊ अवचार आदी समाजबांधव उपस्थित होते. त्यांच्या या नियुक्तीमुळे समाज बांधवांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
