अतिवृष्टीचे संकट गंभीर पण सोबत त्यावर मात करू... आ. सौ. श्वेता महाले

 




नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरु, प्रशासनाला मदत करण्याचे आमदार महाले यांचे आवाहन..

नितीन फुलझाडे 

चिखली: आजचे अतिवृष्टीचे संकट कितीही गंभीर असले तरी आपण सर्व जण मिळून यावर मात करू. चिखली मतदारसंघातील शेतकरी बांधवांनो मी मजबुतीने तुमच्यासोबत उभी आहे. असा संदेश चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्वेता महाले पाटील यांनी सामान्य जनतेला दिला आहे. 


गेल्या दोन दिवसांतील अतिवृष्टीने पिकांचे व घरांचे मोठे नुकसान केले असून आज उत्रादा, पेठ, बोरगाव काकडे, पांढरदेव येथे आमदार सौ. महाले यांच्या आवाहनानुसार व मार्गदर्शनात शेकडो भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते हे अंकुशराव पाटील यांच्यासोबत अतिवृष्टी झालेल्या परिसरात फिरून आवश्यक मदतकार्य करत होते,त्यावेळी शासन स्तरावर पंचनामा करण्यासाठी आलेले उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसीलदार संतोष काकडे, कृषी अधिकारी अशोक सुरडकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.


"या नुकसानीचे व्हिडिओ पाहून माझ्या मनाला अतिशय वेदना होत आहेत. या दुःखातून शेतकरी राजाला बाहेर काढण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करीन हा माझा शब्द आहे." असे आमदार सौ श्वेता महाले पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेला आश्वस्त केले. श्वेता महाले पाटील यांना लंडन येथील कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र रत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला पोहोचल्यानंतर मतदार संघामध्ये अतिवृष्टी व अतिवृष्टीने झालेले नुकसान याबाबतची माहिती त्यांना विविध व्हिडिओने कळवण्यात आली. त्यानंतर त्यांनी लगेच शासकीय स्तरावर जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना सूचना देऊन आणि भाजप कार्यकर्त्यांना आवाहन करून संकटात सापडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी प्रोत्साहित केले.


शेतकरी बांधवांचे हे नुकसान पाहता भाजपा पदाधिकारी यांनी शेतकर्‍यांना सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासनही माझ्या वतीने दिले असून ही प्रक्रिया वेगाने व्हावी यावर माझे लक्ष असेलच.असेही त्या म्हणाल्या.आज ही पाहणी करताना एकनाथराव जाधव जिल्हा उपाध्यक्ष भाजप, डॉ. कृष्णकुमार सपकाळ तालुका अध्यक्ष भाजप, सौ. माया म्हस्के जिल्हा प्रमुख शिवसेना महिला आघाडी,अमोल साठे अमडापूर मंडळ अध्यक्ष, बंडू अंभोरे तालुका अध्यक्ष युवा मोर्चा, लक्ष्मण शेळके पाटील, सुरेश इंगळे पाटील स्वियसहाय्यक,अनमोल ढोरे, संदीप म्हस्के, चेतन म्हस्के, सरपंच, रमेश इंगळे सरपंच तसेच तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक आदी सहभागी होते.

Previous Post Next Post