अल्पसंख्यांकाना काँग्रेस शिवाय पर्याय नाही : ॲड मोहतेशाम रजा
नितीन फुलझाडे
चिखली : देशात धर्म व जात द्वेष निर्माण करणे हा भाजपचा अजेंडा असून याआधारे ते सत्तेवर राहू इच्छितात. द्वेष आणि भयाने ग्रासलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत काँग्रेस ठामपणे उभी राहिली आहे. अल्पसंख्यांकाना काँग्रेस शिवाय पर्याय नाही म्हणून आपण मतभेद सोडून पुन्हा कार्याला सुरवात करा व पक्ष बळकट बनवा. ज्या अल्पसंख्याक समजाला त्यांचे हक्क मिळाले नाही. त्यांना काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आल्यावर मिळवून देईल, अशा विश्वास बुलढाणा जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड मोहतेशाम रजा यांनी व्यक्त केला.
राहुल भाऊ बोंद्रे यांचे जनसेवा जनसंपर्क कार्यालय, जयस्तंभ चौक, चिखली येथे गुरुवार १० जुलै रोजी चिखली शहर काँग्रेस व अल्पसंख्यांक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी ॲड मोहतेशाम रजा बोलत होते.
याप्रंसगी अल्पसंख्यांक चिखली शहराध्यक्ष खलील बागवान, काँग्रेस शहराध्यक्ष राहुल सवडतकर, माजी अध्यक्ष अतहरोधीन काझी, नंदूभाऊ सवडतकर, डॉक्टर मोहम्मद इसरार, सचिन बोंद्रे, अमीनखा उस्मानखा, शहजादअली खान, भास्कर चांदोरे, जाकिरभाई, शकील भाई, व्यंकटेश रिंढे,बबलू एस के, सादिक जमदार, अक्रम बागवान, शकील खान, अजीम खान, शोहेब बागवान, अब्दुल आजीज, मोहीम जमदार, जफर खान, बाबा भाई, अखिल खान, अकिब खान, फारुक बॅग, साहेद भाई,बाशीद बागवान,माजिद बागवान,फैजान बागवान, अब्रार बागवान, जुनेद बागवान, मोसिन बागवान, वसीम मिर्झा,अक्रम मिर्झा, तोसीब शेख, आयान शेख, फैजान शेख, शोहेब खान, शाहिद बागवान, शहेजाद खान, विकार बागवान, आईफास बागवान, विकार बागवान, रियान खान, सलमान खान, शेख समीरज़् शेख शाहिद, अरबाज खान, आदित्य बनसोडे,रोहित कदम, शाहिद खान यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
देशाची एकता अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेस अग्रेसर : खलील बागवान
काँग्रेसच्या सर्वधर्म समभावाच्या विचारसरणीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करायला हवे. देशाची एकता आणि एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच अग्रेसर राहिला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन अल्पसंख्यांक चिखली शहराध्यक्ष खलील बागवान यांनी केले.
