आ. संजय गायकवाड यांच्या हस्ते महाआरती
नितीन फुलझाडे
बुलढाणा: पुज्य गंगामाई स्थापीत तेलंगी समाज ट्रस्ट बुलढाणा द्वारा संचालीत श्री दत्त मंदीर राजे संभाजी नगर येथे गुरुपौर्णिमे निमीत्त विविध धार्मिक कार्यक्रम तसेच आ. संजय गायकवाड यांच्याहस्ते महाआरतीचे आयोजन (दि.10) जुलै रोजी करण्यात आले आहे.भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तेलंगी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.
राजे संभाजी नगर येथे गुरुपौर्णिमे निमीत्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये (दि.10) जुलै रोजी सकाळी 8 ते 10 अभीषेक, सकाळी 10 ते 11 भजन व दुपारी 12 वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर दुपारी 1 ते 5 या दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविक भक्तांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दत्तमंदीर अध्यक्ष चंद्रकांत चिटवार, विश्वस्त चंद्रभुषण मुंगे, कैलास इटावा, सुरेश ग्यारल, बबन गादे, रविकांत चिटवार, आकाश इटवा यासह सर्व दत्त भक्त गण तसेच तेलंगी समाज बांधव, दत्त मंदीर आरती मंडळ,च्या वतीने करण्यात आले आहे.