महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ७२ वा वर्धापन दीन वृक्षारोपण करून साजरा

 



नितीन फुलझाडे 

कामगार कल्याण केंद्र वर्धापन दिनानिमित्त चिखली येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न 

चिखली: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त गट कार्यालय अकोला येथील सहाय्यक कल्याण आयुक्त सौ. वैशाली नवघरे यांच्या मार्गदर्शनात  कामगार कल्याण केंद्र चिखली येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आगार चिखली या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे मा.आमदार सौ.श्वेताताई महाले पाटील यांचे वडील अंकुशराव पडघाण यांची प्रमूख उपस्थिती होती.

        या प्रसंगी प्रमुख पाहुणे अंकुशराव पडघान यांनी वृक्ष हे निसर्गाचा समतोल असुन वृक्षरूपणामुळे एस.टि.आगारातही हरित वातावरण निर्माण होईल,अशी आशा व्यक्त केली. वृक्षारोपण करण्या करिता या विभागाचे आगार व्यवस्थापक संतोष जोगदंडे यांचे मोलाचे सहकार्य  लाभले. जेष्ठ  पत्रकार प्रकाश मेहेत्रे , भाजपा शहर अध्यक्ष सागर पुरोहीत,शिवसेना चिखली शहर प्रमुख विलास घोलप,अखिल भारतीय माळी महासंघ जिल्हाध्यक्ष विजय खरात,डॉ.दिपक खेडेकर(आयुर्वेदाचार्य),चिखली आगाराचे वाहतूक निरीक्षक लामकाने , वाघमारे , सागर परदेशी, गजानन बांडे,प्रशांत झाडगे उपस्थित होते.या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सौ.सीमा बांडे यांनी केले. सूत्र संचालन अनिल कोरे यांनी व प्रास्तविक प्रल्हाद बांडे यांनी तर आभार प्रदर्शन  गणेश जगताप यांनी केले. कार्यक्रमा करिता बाळू भराड,रिंढे मामा,आंनता सुरडकर,सूरेश सपकाळ,बाळू भराड,अभय तायडे,राजू मेहेत्रे यांच्यासह असंख्य कामगार उपस्थित होते.


Previous Post Next Post