बालाजी अर्बनची ग्राहकांच्या सेवेत मोबाईल बँकिंग व क्युआर कोड सुविधा सुरु

 



एक पाऊल आधुनिक सेवेकडे...

नितीन फुलझाडे 
चिखली: बालाजी अर्बन "को-ऑपरेटिव्ह कडुन कार्पोरेटकडे" हे ब्रिद  घेउन आधुनिक युगात तांत्रिक सुविधेसह आपल्या सभासद ग्राहकांना कमर्शियल बँकामध्ये व इतर सर्व बँकामध्ये असलेल्या सर्व प्रकारच्या व्यवहार करण्याच्या सुविधा बालाजी अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटी चिखली र.नं. 413 या संस्थेने सुरू करून प्रगतीचे एक पाउल पुढे टाकले आहे.आपल्या ग्राहक,सभासदांसाठी मोबाईल बँकीग अ‍ॅप व क्यु आर कोड सुविधेचा शुभारंभ आज दिनांक 4 जुलै 2025 रोज शुक्रवारला संंस्थेच्या मुख्य कार्यालयात करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड्. मंगेश हरीभाउ व्यवहारे, उपाध्यक्ष  सत्यनारायण लढढा, ज्येष्ठ संचालक सुदर्शन अंबादास भालेराव, नारायण भवर, प्रताप खरात, तांत्रिक सल्लागार शार्दुल व्यवहारे, सरव्यवस्थापक अनिल गाडे, सहा सरव्यवस्थापक अशोक नाईक, ज्येष्ठ कर्मचारी रमेश देशमुख, नेटविन सॉप्टवेअर इंजिनिअर सुमीत बेलवलकर आणि सर्व कर्मचारी यांचे हस्ते संस्थेचे सभासद विद्यानंद कुटे,  उमेश परिहार, प्रसाद जाधव यांना मोबाईल बँकीग अ‍ॅप व क्युआर कोड वितरीत करण्यात आले.

          भविष्यात या स्पर्धेच्या युगात काळानुरूप व्यवहार करण्याच्या दृष्टीकोनातुन आवश्यक त्या बँकीग सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्‍वासन संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड्. मंगेश हरिभाउ व्यवहारे यांनी संस्थेच्या सभासदांना उददेशुन दिले.
सदर कार्यक्रमास अनेक सभासंदासह संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बालाजी अर्बनच्या सभासदांनी या अत्याधुनिक सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
Previous Post Next Post