*मोठमोठ्या वृक्षांची सर्रास खुलेआम कत्तल*

 




 *चिखली-बुलढाणा रोडवरील प्रकार* 


*वृक्षतोड प्रकरणी संबंधित यंत्रणा कुंभकर्णी झोपेत*


*नितीन फुलझाडे*

*चिखली * :- *एकीकडे शासन वृक्ष लागवड व संवर्धनासाठी तसेच पर्यावरणाचा समतोल राखल्या जावा यासाठी करोडो रुपये खर्च करीत आहे. निसर्ग संवर्धनासाठी वेगवेगळी अभियाने मोठ्या प्रमाणात राबवित आहेत.अशातच दुसरीकडे आर्थिक स्वार्थासाठी मोठमोठ्या वृक्षांची सर्रास खुलेआम कत्तल करण्याचा निंदनीय व पर्यावरणास हानी पोहोचवणारा प्रकार चिखली-बुलढाणा-मलकापूर या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने ठेकेदारा मार्फत सुरू आहे.*



   *हा राज्य महामार्ग BOT(बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर)तत्त्वावर असून याची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी बुलढाणा अर्बन पतसंस्थेकडे आहे. या संबंधित यंत्रणेच्या(कर्मचाऱ्यांच्या)कुंभकर्णी झोपेमुळे  मोठमोठ्या झाडांची कत्तल करण्याची हिम्मत या ठेकेदारात (लाकूड माफियात)येते कशी? याला संबंधित ठेकेदार,कर्मचारी-अधिकारी यांचे आर्थिक हितसंबंध जबाबदार असल्याचेही बोलल्या जात आहे.*

    

*एकीकडे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासनाकडून करोडो रुपये खर्च केल्या जातात,एक वृक्ष आज लावले तर त्याला मोठे होण्यासाठी बराच कालावधी लागतो. यातच ज्या वृक्षांचे संगोपन योग्य प्रकारे झाले तरच ते वृक्ष जगतात. पण काही ठिकाणी फक्त कागदोपत्री वृक्ष लागवड केल्या जाते व योग्य संगोपन देखील न मिळाल्याने क्वचितच वृक्ष जगतात ही सत्य परिस्थिती आहे.*


*चिखली-बुलढाणा-मलकापूर हा राज्य महामार्ग असून या मार्गाच्या दोन्ही बाजूने मोठ-मोठी वेगवेगळ्या प्रकारची महाकाय झाडे आहेत. वाहतुकीस अडथळा होऊ नये या कारणाने रस्त्यात येणाऱ्या झाडांच्या फक्त फांद्या कापण्याची परवानगी  असताना, सर्रास बुडासकट मोठमोठी झाडे,जसेकी ज्यांना दहा ते पंधरा वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला असेल अशी झाडे संबंधित ठेकेदार मोठ्या प्रमाणात कापत आहे*




*या मार्गावरील रहदारीस अडथळा ठरेल अशा झाडांच्या फांद्या छाटण्याऐवजी बुडासकट झाडे साफ करण्याचा प्रकार गेल्या कितीतरी दिवसापासून सुरू आहे. शासकीय यंत्रणा,संबंधित ठेकेदार व देखभाल दुरुस्तीसाठीची यंत्रणा यांची मिलीभगतअसल्याने एव्हढ्या मोठा प्रमाणात वृक्षतोड होत असल्याची ओरड नागरिक करीत आहेत.तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित प्रकार त्वरित थांबून दोषींना योग्य शासन करावे जेणेकरून निसर्गाचा ऱ्हास करणारी व आपली खिसे भरण्यासाठी हपापलेल्या मंडळींना अद्दल घडेल व असा गंभीर प्रकार भविष्यात घडणार नाही* *तुर्तास*...*



*वृक्षांची खुलेआम सर्रास कत्तल होत असताना उपस्थित होणारे काही गंभीर प्रश्न* 


*या ठेकेदाराला बुडासकट झाडे कापण्याची परवानगी दिली कोणी?* 


*मोठमोठ्या झाडांची सर्रास कत्तल करण्यासाठी दोषी कोण?* 


*अर्थपूर्ण संबंधातून हा प्रकार घडतोय का?*


*जिल्ह्याच्या मार्गाने कितीतरी अधिकारी कर्मचारी रोज येजा करतात त्यांना हा वृक्षतोडीचा प्रकार दिसला नाही का?*



*वृक्ष लागवड तर सोडाच पण मोठ मोठ्या वृक्षांची कत्तल करून सामान्य नागरिक व शासनाला चुना लावणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का?*


*कोणी तोंडी मोठमोठी झाडे बुडासकट कापण्याचे ठेकेदारास (लाकूड माफीयास) सांगितले व ते त्याने काटेकोरपणे पालन करून झाडांची कत्तल केली याला दोषी कोण?* 


*संबंधित यंत्रणेची वृक्षांच्या फांद्या कापताना लक्ष ठेवण्याची जबाबदारी नाही का?*



*सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारच्या चिखली बुलढाणा मलकापूर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू नसताना बुडासकट झाडे कापण्याचा घाट का* 


*ज्या यंत्रणेकडे या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आहे त्या यंत्रणेने संबंधित ठेकेदारास रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या मोठमोठ्या वृक्षांची बुडापासून कत्तल करण्याची परवानगी दिली का?*





*संबंधित यंत्रणा वृक्षतोड होण्याची व त्याची बातमी लागण्याची वाट पाहत होती का?*


*कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग या प्रकरणाची चौकशी करणार का? दोषींना शिक्षा होणार का?*




*बुडासकट कापलेल्या झाडांची जीपीएस छायाचित्रे..*

Previous Post Next Post