उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मासरूळ जिल्हा परिषद सर्कल मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन...

 



 राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे यांच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन...

नितीन फुलझाडे 

चिखली(मासरूळ):-उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मासरूळ जिल्हा परिषद सर्कल मध्ये विविध कार्यक्रमांचे  आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात सातगाव येथून करण्यात आली. सातगाव येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन बुलढाणा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, निलेश देठे यांच्या वतीने सातगाव येथे करण्यात आले होते. यामध्ये नेत्ररोग, हृदयरोग, बालरोग, त्वचारोग, अशा विविध आजारासंबंधी मोफत तपासण्या करण्यात आल्या.यामुळे सातगाव व परिसरातील अनेक रुग्णांना दिलासा मिळाला. ज्या रुग्णांना आरोग्य तपासणीनंतर शस्त्रक्रियेची गरज आहे अशा रुग्णांसाठी गोदावरी फाउंडेशन, जळगाव खान्देश येथे मोफत शस्त्रक्रिया केली जाईल,असे यावेळी दांडगे यांनी आश्वासित केले.कुंबेफळ व टाकळी येथे मनोज दांडगे यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील 200 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य पाहून आनंद वाटला असे प्रतिपादन मनोज दांडगे यांनी यावेळी केले.ज्ञानदेवराव बापू दांडगे विद्यालय,धाड येथे वक्तृत्व स्पर्धेचे भव्य उदघाटन संपन्न झाले.यावेळी विविध विषयावर विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांशी हितगुज ही श्री.दांडगे यांनी केले.

  मासरूळ या गावामध्ये श्री शिवाजी विद्यालयात वृक्षारोपण करून पर्यावरणाचा संदेश अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त देण्यात आला.


वाढदिवसानिमित्त मढ येथील समारोपीय कार्यक्रम म्हणून श्री क्षेत्र बुधनेश्वर संस्थान येथे दुग्धभिषेक व महाआरती करून कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी सातगाव येथील निलेश देठे, शिवाजीराव पालकर, विकास पालकर, सुरेश देठे,शंकर देठे, अविनाश बरगडे, सुनील हिवाळे, समाधान शिंदे, प्रदीप घुसळकर, दिलीप देठे,पंढरी पालकर, उमेश देठे, समाधान पालकर,गजानन पालकर, नारायण पालकर,कुंबेफळ येथील अंबादास बावस्कर,राहुल वाघ, दत्तू आघाव, दिपक बावस्कर,समाधान दांडगे टाकळी येथील राजेश नागवे,दत्ता गोराडे, गणेश तायडे,सुनील उगले, संतोष गोराडे,विठ्ठल तायडे, संदीप शिंबरे,अंबादास शिंबरे पवन कोलते, तराडखेड येथील दिनकर बापू देशमुख,रामदास पाटील वाघ,जमील सेठ,उत्तम रुस्तुके मासरूळ येथील गणेश नरवाडे, पांडुरंग गुळवे, पांडुरंग पवार,हरिभाऊ सिनकर, शुभम नरवाडे, बाबुराव सिनकर, डोमरूळ येथील संजय जाधव विजय धंदर,तुषार धंदर, कुलमखेड येथील विठ्ठलसिंग मोरे, जगन कानडजे, शेषराव कानडजे, सोनू मोरे, कल्याणसिंग मोरे, वरुड येथील सुभाष राऊत, संतोष राऊत, वैभव पोतदार, जामठी येथील बिलाल गायकवाड,कौतिकराव नरोटे (शेकापूर), जाकिर सेठ,गणेश तायडे,रामेश्वर तायडे,सुभाष तायडे,संदिप तायडे,संजय तायडे,रमेश तायडे, शैलेश सोनुने,गजानन अवकाळे, विशाल तायडे,शुभम तायडे, हर्षल तायडे,गणेश पवार ,निलेश खिरडकर,रामदास अंभोरे यांच्यासह या विविध कार्यक्रमा-दरम्यान मासरूळ जिल्हा परिषद सर्कल मधील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post