चिखली : शहरातील सोने-चांदीचे प्रतिष्ठीत व्यापारी सुभाषआप्पा वैजिनाथआप्पा बोंद्रे यांचे आज दि. १२ जुलै रोजी हृदयविकराच्या झटक्याने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ७५ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. आज रात्री ९ वाजता स्थानिक जाफराबाद रोडवरील नानासेठ बोंद्रे यांच्या वीटभट्टीच्या परिसरात त्यांचे पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
