नितीन फुलझाडे
चिखली:- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कार्यालय अकोला अंर्तगत कामगार कल्याण केंद्र चिखली यांच्ये वतीने सहायक कल्याण आयुक्त श्रीमती वैशाली नवघरे मॅडम यांचे मार्गदर्शनात 'आंतरराष्ट्रीय योग दिना ' निमित्त दिनांक १५.०६.२०२५ ते २१.०६.२०२५पर्यंत योगा शिबिराचे आयोजन वैदयकीय महाविदयाल, आयुर्वेदिक रुग्णालय चिखली येथे संपन्न झाले.
या प्रसंगी प्रशिक्षणाच्या उद्घाटनाची सुरुवात धन्यंतरी प्रतिमेची पुजन प्रशिक्षक डॉ. दिपक खेडेकर तर प्रमुख पाहुणे सौ.गिताताई बांडे सौ. आंबेकर ताई यांच्या प्रमुख उपस्थिती प्रशिक्षक डॉ. दिपक खेडेकर यांनी ७ दिवस प्रशिक्षण दिले. योग प्रशिक्षणाच्या समारोपा करीता प्रमुख पाहुणे मेजर आजाबराव कारले, डॉ. जयेश काछवाल, व प्रशिक्षक दिपक खेडेकर यांचे उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केंद्र उपसंचालिका सौ. सिमा बांडे यांनी केले तर संचलन गणेश जगताप व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रल्हाद बांडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता स्वानंद कुलकर्णी, शिवाभाऊ देशमुख,परीक्षित बांडे व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

